OMG!! सासूबाईने केला ‘तुफान’ डान्स, बघण्यासारखा होता समीरा रेड्डीचा चेहरा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 02:11 PM2020-03-12T14:11:10+5:302020-03-12T14:11:29+5:30
समीराने सासूबाईसोबत पूर्ण केले‘फ्लिप द स्विच’ चॅलेंज
समीरा रेड्डीने बॉलिवूडला कधीचाच रामराम ठोकलाय. दोन मुलांची आई असलेली समीरा आता चर्चेत असते ती केवळ तिच्या फोटो वा व्हिडीओमुळे. होय, सध्या समीरा अशाच एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडीओत समीरा आपल्या सासूबाईना नाचवताना दिसतेय.
समीराने सासूबाईसोबत ‘फ्लिप द स्विच’ चॅलेंज पूर्ण केले. याचा व्हिडीओ समीराने सोशल मीडियावर शेअर केला. आता हे चॅलेंज नेमके काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर यात एकाच गाण्यावर नाचताना फोटोग्राफर आणि परफार्मरची अदलाबदली होते. म्हणजे, पहिला नाचतो, दुसरा व्हिडीओ शूट करतो. यानंतर पहिला व्हिडीओ शूट करतो तर दुसरा नाचतो. समीरा व तिच्या सासूबाई मंजिरी वर्दे यांनी हे चॅलेंज पूर्ण केले. आधी समीराने डान्स केला आणि मग तिच्या सासूने.
या व्हिडीओ बघण्यासारखे आहेत ते समीराच्या चेह-यावरचे हावभाव. होय, सासूबाई नाचत असताना समीरा थक्क होऊन बघत राहिली. ‘जब आपका सारा तुफान आपकी सास चुरा ले जाए,’ या कॅप्शनसह समीराने हा व्हिडीओ शेअर केलाय.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. आत्तापर्यंत 5 लाखांवर लोकांनी तो पाहिला असून तेवढ्याच मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. ‘तुझ्यापेक्षा तुझी सासू जास्त चांगली नाचते,’ असे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एकाने लिहिले आहे. तर अन्य एकाने ‘तुझी सासू फारच कूल आहे,’ असे लिहिले आहे.
सासूसोबतचे काही फोटोही समीराने शेअर केले आहेत.
समीराने 2002 मध्ये ‘मैंने दिल तुझको दिया’ या चित्रपटातून डेब्यू केला होता. पण तिचा हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. यानंतर 2004 मध्ये आलेल्या ‘मुसाफिर’ या चित्रपटाने तिला खरी ओळख दिली.हा चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर नो एन्ट्री, टॅक्सी नंबर 9211 अशा चित्रपटात ती झळकली. पण पुढे यश हुलकावणी देत राहिले आणि अखेर समीराने बॉलिवूड सोडून लग्न करण्याचा निर्णय घेतला.