Join us

९ महिन्याची गरोदर असताना अभिनेत्रीने केले होते अंडरवॉटर फोटोशूट, पाहून भल्या भल्यांची बोलती झाली होती बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 06:00 IST

समीरा रेड्डीने अंडरवॉटर मॅटर्निटी फोटोशूट करत चाहत्यांनाही आश्चर्यांचा जबर धक्काच दिला होता. आतपार्यंत अशाप्रकारचे फोटोशूट करण्याचे धाडस बॉलिवूडमध्ये तरी कोणत्याच अभिनेत्रीने केले नव्हते.

अभिनेत्री समीरा रेड्डी लग्नानंतर बॉलीवूडपासून दूर जात संसारात रमली आज ती दोन मुलांची आई आहे. सध्या ती मदरहुड एन्जॉय करत आहे. सोशल मीडियावर फोटो व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. सिनेमा तिचे दर्शन घडत नसले तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तिचे दर्शन घडते. अनुष्का करिनाप्रमाणे समीराची प्रेग्नंसीदेखील तुफान चर्चेत राहिली होती. 

विशेष म्हणजे समीराने अंडरवॉटर मॅटर्निटी फोटोशूट करत चाहत्यांनाही आश्चर्यांचा जबर धक्काच दिला होता. आतपार्यंत अशाप्रकारचे फोटोशूट करण्याचे धाडस बॉलिवूडमध्ये तरी कोणत्याच अभिनेत्रीने केले नव्हते. ९ महिन्याची गरोदर असतानाच समीराने हे खास फोटोशूट केले होते.

प्रेग्नसीच्या काळात समीरा सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह होती. आपल्या विषयीच्या सगळ्या गोष्टी ती तिच्या चाहत्यांसह शेअर करायची. प्रेग्नंट असल्याची बातमीही तिने सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली होती. त्यावेळी तिने केलेले फोटोशूटने सा-यांचे लक्ष वेधले होते. फोटोशुटमधले निवडक फोटो तिने चाहत्यांसह शेअऱ केले होते. या फोटोंना तिने कॅप्शन देत म्हटले होते की, 'प्रत्येकजण आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या स्थितीत आणि साइजमध्ये असतो.

 

आपल्याला प्रत्येक परिस्थितीत स्वत:वर प्रेम करता आले पाहिजे.' अनेकांनी या फोटोंवर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या तर काहींनी यावरून टीकाही केली होती.'आता एवढेच पाहायचे राहिले होते, असे एका युजरने लिहिले होते. तर काहींनी फोटोशूटच्या नावावर बाळाला का त्रास देते आहेस,असे लिहिले होते.

समीरा बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये दिसली. 'डरना मना है', 'मुसाफिर,'नो एंट्री','प्लान',' टॅक्सी नंबर 9 2 11 'आणि' दे दना दन ' या सिनेमांमध्ये ती झळकली. २०१२ मध्ये रिलीज झालेल्या प्रकाश झाच्या 'चक्रव्यूह'मध्ये ती शेवटीची दिसली होती.एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखती समीरा रेड्डी म्हणाली की, लोक तिला म्हणायचे की, ती फार सावळी आणि फार उंच आहे. या कारणाने ती सामान्य भारतीय मुलीसारखी दिसत नाही. समीरा म्हणाली की, तिने बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण करण्याचे अनेक प्रयत्न केले, पण तिला यश मिळू शकलं नाही.

टॅग्स :समीरा रेड्डीअनुष्का शर्मा