Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या जन्मानंतर डिप्रेशनमध्ये गेली होती बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री, 105 किलो झाले होते वजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 12:33 IST

आपल्या पहिल्याच म्युझिक व्हिडिओमुळे तिने रसिकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे.

अभिनेत्री समीरा रेड्डी सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती नेहमी पोस्ट करत असते. लग्नानंतर ती बॉलिवूडपासून दूर झाली आणि संसारात रमली. समीरा दोन मुलांची आई बनली आहे. आपल्या पहिल्याच म्युझिक व्हिडिओमुळे तिने रसिकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. समीरा रेड्डीने 1997 मध्ये गझल गायक पंकज उधास यांच्या म्युझिक व्हिडिओद्वारे आपल्या कारकीर्दीची सुरूवात. 

समीराने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, मुलाच्या जन्मानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती. प्रेग्नेंन्सीनंतर समीराला प्लेसेंटा प्रिव्हिया झाला, ज्यामुळे ती सुमारे 4 ते 5 महिने तिला बेडरेस्ट होता. तिचे वजन वाढले होते ज्यामुळे ती मानसिक तणावाखाली गेली. मुलाच्या जन्मानंतर तिचं वजनं 105 किलो झालं होतं. 

 2014 मध्ये समीराने बिझनेसमन अक्षय वर्देसोबत विवाह केला. लग्न झाल्यावर तिने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला. समीरा आणि अक्षय एका अ‍ॅड शूटच्या दरम्यान झाली होती. दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर समीरा आणि अक्षयने लग्नाचा निर्णय घेतला. मराठमोळ्या पद्धतीने समीराचे लग्न झाले होते. 2015 साली समीराने हंसला जन्म दिला.

समीरा बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये दिसली. 'डरना मना है', 'मुसाफिर,'नो एंट्री','प्लान',' टॅक्सी नंबर 9 2 11 'आणि' दे दना दन ' या सिनेमांमध्ये ती झळकली. २०१२ मध्ये रिलीज झालेल्या प्रकाश झाच्या 'चक्रव्यूह'मध्ये ती शेवटीची दिसली होती. साली 'मैंने दिल तुझको दिया' या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 

टॅग्स :समीरा रेड्डी