Join us

ओळखलंत का? सोशल मीडियावर या अभिनेत्रीने शेअर केला जुना फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 13:38 IST

सोशल मीडियावर नेहमी कलाकार आपले जुने फोटो शेअर करत असतात.

सोशल मीडियावर नेहमी कलाकार आपले जुने फोटो शेअर करत असतात. हे फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांना त्यांना ओळखणंही कठीण होऊन जातं. आता असाच एक फोटो समोर आला आहे जो बॉलिवूडच्या अभिनेत्रीनं शेअर केला आहे.

समीरा रेड्डीने तिच्या टीनएजमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती फिट दिसत नाही. तिने चेक्सचं शर्ट परिधान केलं आहे. हा फोटो शेअर करत समीराने लिहिलं की, मस्करीत पण मी सातत्याने संघर्ष करत आहे. तेव्हा मला कसं जज केलं जात होतं. माझ्यावर चांगलं दिसण्याचं खूप प्रेशर होतं. एक प्रेम करणारा नवरा आणि दोन मुलं असतानादेखील मी आजदेखील माझ्या शरीरयष्टीला घेऊन मला संकोच वाटतो.  

यापूर्वीदेखील समीरा कित्येकदा वजन आणि रंगाबद्दल बोलली आहे. तिने एक बालपणीचा फोटो शेअर करत लिहिलं की, ओळखा पाहू? वय १३ वर्षे, क्लासमध्ये सर्वात उंच पण तिच्यासाठी विचित्र होते. काश जर कुणी मला स्वतःशी प्रेम करायला शिकवलं असतं. मी माझं पूर्ण टीनएज, लोक मला स्वीकारतील की नाही आणि वजन घटविण्यात घालवलं. 

समीरा रेड्डीने १२ जुलैला एका मुलीला जन्म दिला होता.

बॉलिवूडपासून दूर असलेली समीरा बऱ्याचदा चर्चेत असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. 

टॅग्स :समीरा रेड्डी