90s मधली आघाडीची अभिनेत्री नीलम कोठारीने (Neelam Kothari) समीर सोनीसोबत (Samir Soni) लग्न केल आणि नंतर ती पडद्यावरु गायब झाली. गेल्या काही दिवसांपासून नीलम आणि समीर सोनी यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या. समीरच्या एका इन्स्टाग्राम पोस्टवरुन या चर्चा सुरु झाल्या होत्या. आता यावर समीरने मौन सोडलं आहे. नीलम आणि माझ्यात सर्वकाही ठीक असल्याचं त्याने स्पष्टीकरण दिलं आहे.
काही दिवसांपूर्वी समीर सोनीने इन्स्टाग्राम पोस्ट केली होती. जोडीदार निवडण्यासाठीच्या टीप्स यामध्ये लिहिलेल्या असतात. "जर तुम्हाला श्रीमंत नवरा हवा तर तुम्हाला आकर्षक दिसावं लागले. जर तुम्हाला सुंदर बायको हवी तर खूप मेहनत करुन पैसे कमवावे लागतील. आणि इतर ज्यांना फक्त आनंदी संसार हवा, त्यांनी सुरुवातीला ६ महिने एकत्र राहिलं पाहिजे आणि मगच निर्णय घेतला पाहिजे."
समीर सोनीच्या या पोस्टनंतर चर्चांना उधाण आलं होतं. आता यावर त्याने स्वत:च स्पष्टीकरण दिले आहे. तो म्हणाला, "एका शोभून न दिसणाऱ्या जोडीकडे बघून मला हे सुचलं होतं. काळजी करु नका माझ्यात आणि नीलममध्ये सगळं काही ठीक आहे. मी तर स्वप्नातही वेगळं होण्याचा विचार करुन शकत नाही. हे तर मी एका निरीक्षणातून म्हणालो. आजकाल एखाद्या सुंदर महिलेसोबत असा नवरा असतो जो अजिबातच चांगला दिसत नाही पण त्याच्याकडे पैसा असतो. मी फक्त हे सांगतोय की आजकाल हेच पाहायला मिळत आहे. आजकाल लोकांना पैशातून सुरक्षित वाटते आणि त्यालाच प्राधान्य दिलं जातं.
समीर सोनी आणि नीलम 2011 मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यांना आहाना ही मुलगीही आहे. १४ वर्षांपासून त्यांचा सुखाचा संसार सुरु आहे.