अभिनेत्री सना खान दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने एका मुलाला जन्म दिला आहे. सनाला एक ३ वर्षांचा मुलगा आहे. त्याचे नाव तारिक जमील आहे. सनाची डिलिव्हरी काही दिवसांपूर्वीच झाली. ३ दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर, अभिनेत्री घरी परतली आहे, जिथे तिचं आणि बाळाचं मोठं स्वागत करण्यात आलं.
सनाने तिच्या यूट्यूब व्लॉगमध्ये याची एक झलक दाखवली होती की, जेव्हा ती घरी आली तेव्हा तिचं मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आलं. तिला आणि बाळाला खूप भेटवस्तूही मिळाल्या. आता सनाने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने सांगितलं आहे की, ती छोट्या छोट्या गोष्टींवर रडत आहे. ती खूप इमोशनल होत आहे.
सनाने पोस्टमध्ये लिहिलं - "मी स्ट्राँग आहे, मला हे माहीत आहे. पण मी छोट्या छोट्या गोष्टींवर रडत आहे. कारण ही मी आहे." सनाने आणखी एक पोस्ट शेअर केली. "आजच्या काळात मी फक्त ३ गोष्टींवर काम करत आहे, ते म्हणजे माझं जीवन, माझी शांती आणि माझ्या पुढच्या व्हेकेशनचा प्लॅन. हो, ही मीच आहे" असं सनाने म्हटलं आहे.
सनाने लग्नानंतर इंडस्ट्री सोडली. ती जेव्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला तर लोकांनी तिला खूप ट्रोल केलं. हे लग्न फक्त तीन महिनेच टिकेल, सहा महिन्यांत डिवॉर्स होईल. हिला मुलं कधीच होणार नाही असं लोक म्हणायचे असं देखील सनाने सांगितलं. पती मुफ्ती अनसने तिला तिच्या कठीण काळात खूप मदत केली. आधार दिला आहे.