Join us

लग्नाच्या महिन्याभरातच सना खान सोशल मीडियावर म्हणते, माझे हृदय तुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 18:05 IST

सनाने पोस्ट करून लिहिले आहे की, तिचे हृदय पूर्णपणे तुटलेले आहे.

ठळक मुद्देसनाने पोस्ट करून लिहिले आहे की, तिचे हृदय पूर्णपणे तुटलेले आहे. तसेच तिने या पोस्टमध्ये नाव न घेता तिच्या एका माजी प्रियकरचा उल्लेख केला आहे. सना खानने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

‘अल्लाह’साठी बॉलिवूड इंडस्ट्री सोडणारी अभिनेत्री सना खानने गेल्या नोव्हेंबर महिन्या सूरतच्या मुफ्ती अनस सईदसोबत गुपचूप निकाह केला. सनाने बॉलिवूड सोडले असले तरी सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते. तिच्या पतीचे आणि तिचे फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. पण तिच्या जुन्या बॉयफ्रेडमुळे तसेच सोशल मीडियावरील पतीसोबतच्या फोटोंमुळे सनाला सोशल मीडियावर नेहमीच ट्रोल केले जाते. आता या सगळ्या गोष्टींना कंटाळून सनाने एक भावुक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

सनाने पोस्ट करून लिहिले आहे की, तिचे हृदय पूर्णपणे तुटलेले आहे. तसेच तिने या पोस्टमध्ये नाव न घेता तिच्या एका माजी प्रियकरचा उल्लेख केला आहे. सना खानने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने म्हटले आहे की, काही लोक अनेक दिवसांपासून माझ्यावर नकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. तसेच माझ्यावर नकारात्मक व्हिडिओ बनवत आहेत. या सगळ्या गोष्टी मी सतत पाहात असले तरी मी गप्प बसले होते. पण आता माझ्या भूतकाळाशी निगडित एक व्हिडिओ सोशल मीडियावर बनवण्यात आलेला आहे. या व्हिडिओत अनेक चुकीच्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. एखादी व्यक्ती ज्या गोष्टी पूर्णपणे विसरली आहे, त्या व्यक्तीला त्या गोष्टींची आठवण करून देणे चुकीचे आहे. 

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, मला त्या व्यक्तीचे नाव घ्यायचे नाहीये... कारण त्या व्यक्तीने माझ्यासोबत जे केले आहे, ते मला त्या व्यक्तीसोबत करायचे नाहीये... कोणाचे तुम्ही समर्थन करू शकत नसाल तर त्याच्याबद्दल वाईट तरी बोलू नये... अशाप्रकारच्या कमेंट करून कोणाला डिप्रेशनमध्ये तरी टाकू नका... भूतकाळाचा विचार करून स्वतःला कोणी दोषी मानेल असे करू नका... काही लोक आयुष्यात खूप पुढे जातात... पण काही माझ्यासारखे असतात की ते विचार करत बसतात की, भूतकाळात जाऊन मी गोष्टी बदलू शकेन... कृपया चांगली व्यक्ती बना आणि दुसऱ्यांनादेखील चांगली व्यक्ती बनू द्या... 

सना लग्नाच्याआधी कोरिओग्राफर मेल्विन लुईसला डेट करत होती. सनाने मेल्विनवर धोका दिल्याचा आरोप लावला होता. ब्रेकअपनंतर सनाने सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि पोस्ट शेअर केले होते. 

टॅग्स :सना खान