Join us

माझा ‘शौहर’ ‘बेस्ट शौहर’...! सना खानने पतीसाठी केली प्रार्थना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 10:43 IST

सध्य सना आपल्या पतीसोबत हनीमूनवर आहे. काश्मीरमध्ये दोघेही हनीमून एन्जॉय करत आहेत.

ठळक मुद्देसना खान ही अभिनेत्री बिग बॉस 6 दरम्यान चर्चेत आली होती. 2005 मध्ये ‘यही है हाय सोसायटी’ या चित्रपटातून तिने अभिनयाची कारकिर्द सुरु केली होती.

‘अल्लाह’साठी बॉलिवूड इंडस्ट्री सोडणारी अभिनेत्री सना खानने गेल्या नोव्हेंबर महिन्या सूरतच्या मुफ्ती अनस सईदसोबत गुपचूप निकाह केला. सध्य सना आपल्या पतीसोबत हनीमूनवर आहे. काश्मीरमध्ये दोघेही हनीमून एन्जॉय करत आहेत. अशात सना यादरम्यानचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करताना दिसतेय. आता सनाने इन्स्टा स्टोरीवर आपल्या पतीसाठी प्रार्थना केली आहे.अनसचा फोटो शेअर करत सनाने लिहिले, ‘अल्लाह तुम्हें हमेशा सलामत रखे और मेरे सार्थ जन्नत तक रखे.’ या पोस्टसोबत सनाने ‘बेस्ट शौहर’ असा हॅशटॅग दिला आहे.

‘अल्लाह’साठी अभिनय आणि ग्लॅमर दुनियेला रामराम ठोकणारी अभिनेत्री सना खान हिने गुपचूप ‘निकाह’ केला आणि तिच्या ‘निकाह’ची बातमी ऐकून प्रत्येकाला आश्चयार्चा धक्का बसला होता. 20 नोव्हेंबरला सनाने मौलाना मुफ्ती अनस यांच्याशी ‘निकाह’ केला. सूरतमध्ये हा निकाह पार पडला होता. यानंतर लगेच या ‘निकाह’चे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.  सना खानने ग्लॅमर इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय देत सर्वांना जोरदार धक्का दिला होता. मानवतेची सेवा करण्यासाठी आणि अल्लाहच्या मागार्चे अनुसरण करण्यासाठी ग्लॅमर दुनिया सोडत असल्याचे तिने जाहिर केले होते.

सना खान ही अभिनेत्री बिग बॉस 6 दरम्यान चर्चेत आली होती. 2005 मध्ये ‘यही है हाय सोसायटी’ या चित्रपटातून तिने अभिनयाची कारकिर्द सुरु केली होती. यानंतर हिंदी, मल्याळम, तामिळ, तेलगू, कन्नड अशा भाषेतील अनेक सिनेमे तिने केलेत. बिग बॉस आणि फिअर फॅक्टर या  शोमध्ये सुद्धा ती झळकली होती.

  

अल्लाहसाठी घेतला सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय‘आज मी आयुष्याच्या एका महत्त्वाच्या वळवणार पोहोचली आहे. मी अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत आहे. या काळात मला पैसा, प्रतिष्ठा, प्रेम सगळे काही मिळाले. चाहत्यांकडून मिळालेल्या या सर्वगोष्टींसाठी मी त्यांची आभारी आहे. पण काही दिवसांपासून एक वेगळाच प्रश्न पडला होता. पैसा, प्रसिद्धी मिळवणे हेच जगात येण्याचे उद्दिष्ट आहे का?  जे  निराधार, अनाथ आहेत अशांसाठी आपले काहीच कर्तव्य नाही का? मृत्यू कधीही गाठू शकतो आणि मेल्यानंतर आपले काय; हा विचार आपण करायला नको? या प्रश्नांची उत्तरं मी शोधतेय.  विशेषत:  मरणानंतर माझे काय होईल? या प्रश्नाचे उत्तर मी शोधते आहे. त्यामुळे आज मी घोषणा करते की, आजपासून मी बॉलिवूड इंडस्ट्रीतील आयुष्य सोडून मानवता आणि अल्लाहच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेते आहे. माज्या सर्व बहिण-भावांना विनंती करते की, यापुढे इंडस्ट्रीतील कोणत्याही गोष्टीसाठी मला निमंत्रण देऊ नये. खूप खूप आभार,'असे लिहित तिने आपला निर्णय जगाला कळवला होता.

टॅग्स :सना खान