Join us

सना खानने सांगितले फिल्म इंडस्ट्री सोडण्यामागचे खरे कारण, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 11:04 AM

बॉलिवूड अभिनेत्री सना खान हिने ‘अल्लाह’साठी अभिनय आणि ग्लॅमर दुनियेला रामराम ठोकला आणि पाठोपाठ गुपचूप ‘निकाह’ सुद्धा केला.

ठळक मुद्देसना खान ही अभिनेत्री बिग बॉस 6 दरम्यान चर्चेत आली होती. 2005 मध्ये ‘यही है हाय सोसायटी’ या चित्रपटातून तिने अभिनयाची कारकिर्द सुरु केली होती.

बॉलिवूड अभिनेत्री सना खान हिने ‘अल्लाह’साठी अभिनय आणि ग्लॅमर दुनियेला रामराम ठोकला आणि पाठोपाठ   गुपचूप ‘निकाह’ सुद्धा केला. ग्लॅमर इंडस्ट्री सोडण्यासोबतच तिच्या ‘निकाह’ची बातमी ऐकून प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसला होता. आता सनाने बॉलिवूड सोडण्यामागचे खरे कारण सांगितले आहे. सनाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात ती ग्लॅमर इंडस्ट्री सोडल्यानंतर आयुष्यात झालेल्या बदलांबद्दल बोलते आहे.ती म्हणते, ‘माझ्या जुन्या आयुष्यात यशाची व्याख्या वेगळी होती. काम करणे, संपत्ती गोळा करणे, फॅन फॉलोइंग वाढवणे हेच माझ्यासाठी यश होते. मात्र गेल्या 7 वर्षांपासून मी कुराण वाचणे सुरु केले आणि हळूहळू मला सगळ्या गोष्टी कळू लागल्या. यशाचा खरा अर्थ मला कळला. जगाच्या नजरेत यशस्वी होणे म्हणजे यश नाही. अल्लाहच्या नजरेत यशस्वी तोच खरा यशस्वी. तेव्हा अल्लाहच्या नजरेत यशस्वी बना. दुस-यांसोबत चांगले वागा. त्यांच्या चेह-यावर हास्य आणा. लोकांना मदत करा, चांगले व्यक्ती बना.’

सनाने हा व्हिडीओ शेअर करतानाही अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. यश म्हणजे काय? मुळात आपल्याला कोणत्या यशाची अपेक्षा असते? जग आणि दिवस एकत्र चालतात. पण यापैकी एक निवडण्याची वेळ येते, तेव्हा जग नाही तर दिवस निवडा. असे केल्यास तुम्हाला जे करायचे ते सगळे मार्ग अल्ला तुमच्यासाठी खुले करेन,असे तिने म्हटले आहे.गत 20 नोव्हेंबरला सनाने मौलाना मुफ्ती अनस यांच्याशी ‘निकाह’ केला. सूरतमध्ये हा निकाह पार पडला होता. यानंतर लगेच या ‘निकाह’चे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

 20 नोव्हेंबरला सनाने मौलाना मुफ्ती अनस यांच्याशी ‘निकाह’ केला. सूरतमध्ये हा निकाह पार पडला होता. यानंतर लगेच या ‘निकाह’चे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सना खानने ग्लॅमर इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय देत सर्वांना जोरदार धक्का दिला होता. मानवतेची सेवा करण्यासाठी आणि अल्लाहच्या मागार्चे अनुसरण करण्यासाठी ग्लॅमर दुनिया सोडत असल्याचे तिने जाहिर केले होते.

सना खान ही अभिनेत्री बिग बॉस 6 दरम्यान चर्चेत आली होती. 2005 मध्ये ‘यही है हाय सोसायटी’ या चित्रपटातून तिने अभिनयाची कारकिर्द सुरु केली होती. यानंतर हिंदी, मल्याळम, तामिळ, तेलगू, कन्नड अशा भाषेतील अनेक सिनेमे तिने केलेत. बिग बॉस आणि फिअर फॅक्टर या  शोमध्ये सुद्धा ती झळकली होती.

माझा ‘शौहर’ ‘बेस्ट शौहर’...! सना खानने पतीसाठी केली प्रार्थना

टॅग्स :सना खान