Join us

'अ‍ॅनिमल २'च्या आधी संदीप रेड्डी वांगाचा हा सिनेमा होणार रिलीज, पहिल्यांदाच या सुपरस्टारसोबत करणार काम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 11:45 AM

Animal Movie : 'अ‍ॅनिमल' हा सिनेमा यावर्षीचा सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. यात रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदाना आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत आहेत.

'अ‍ॅनिमल' (Animal Movie) हा सिनेमा यावर्षीचा सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. यात रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदाना आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट अद्याप बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले आहे. चित्रपटाच्या शेवटी पोस्ट क्रेडिटमध्ये 'अ‍ॅनिमल'चा सीक्वेल बनवणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र या चित्रपटापूर्वी संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) दुसरा चित्रपट बनवणार आहे.

'अ‍ॅनिमल'च्या आधी बनवणार असलेल्या चित्रपटाच्या नावाचा खुलासा झाला आहे. यासोबतच संदीप रेड्डी वांगाच्या आगामी चित्रपटात कोणता अभिनेता मुख्य भूमिकेत दिसणार आहे, याचादेखील खुलासा झाला आहे. त्याच्या पुढील सिनेमाचं नाव आहे स्पिरिट. यात प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही माहिती खुद्द स्वतःला चित्रपट समीक्षक म्हणवणाऱ्या अभिनेता केआरके म्हणजेच कमाल आर खानने दिली आहे.     

केआरकेचं ट्विट व्हायरलकेआरके सिने कलाकार आणि त्यांच्याशी निगडीत माहिती सोशल मीडियावर देत असतो. त्याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंट एक्सवर संदीप रेड्डी वांगाच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगितले. त्याने लिहिले की, संदीप रेड्डी वांगाचा पुढील सिनेमा स्पिरिट असेल ना की 'अ‍ॅनिमल २'. केआरकेची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. 

प्रभासचा सालार नुकताच रिलीज झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दररोज दमदार कमाई करत आहे. तर संदीप रेड्डी वांगाच्या 'अ‍ॅनिमल'नेदेखील दमदार कमाई केली आहे. 

टॅग्स :रणबीर कपूर