Join us

"मला आधी प्रेम शोधावं लागेल मग.."; शोएबपासून वेगळी झाल्यावर पहिल्यांदाच व्यक्त झाली सानिया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 3:05 PM

क्रिकेटपटू शोएब मलिकपासून वेगळं झाल्यावर सानिया मिर्झाने पहिल्यांदाच मोजक्या शब्दात तिच्या भावना व्यक्त केल्यात (sania mirza)

भारताची आघाडीची टेनिसपटू म्हणजे सानिया मिर्झा.सानिया मिर्झाने विविध टेनिस स्पर्धा जिंकत जगात नाव कमावलं. सानिया गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. सानिया तिचा पती आणि क्रिकेटपटू शोएब मलिपासून वेगळी झाली. शोएबने दुसरं लग्न करुन या बातमीला पुष्टी दिली. आता 'सानिया द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मध्ये सहभागी झाली. त्यावेळी तिने घटस्फोटानंतर पहिल्यांदाच भाष्य केलंय.

मला आधी प्रेम शोधावं लागेल: सानिया मिर्झा

'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मध्ये सानिया मिर्झा सहभागी झाली होती. शोएब मलिकपासून वेगळी झाल्यावर सानिया पहिल्यांदाच जाहीर प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळाली. त्यावेळी कपिल शर्माने सानियाला प्रश्न विचारला. एकदा शाहरुख खान म्हणाला होता, जर सानिया मिर्झावर बायोपिक आला तर मला त्या सिनेमात तिच्या लव्ह पार्टनरची भूमिका साकारायला आवडेल. याच गोष्टीची आठवण कपिलने सानियाला करुन दिली. तेव्हा सानिया म्हणाली, "सध्या मलाच प्रेम शोधावं लागेल." सानियाच्या या उत्तराने अर्चना पुरण सिंग आणि कपिल शर्मा खळखळून हसले.

सानिया मिर्झा कपिल शर्मा शोच्या नवीन एपिसोडमध्ये

सानिया मिर्झा, मेरी कोम, सानिया नेहवाल या देशाचं नाव उंचावणाऱ्या खेळाडू 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा'च्या नवीन एपिसोडमध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी सानियाने एकदम हशामस्करी करत शोमध्ये आनंद लुटला. १९ जानेवारीला सना जावेदसोबत लग्न करुन शोएब मलिक सानियासोबत वेगळा झाला. या घटनेनंतर सानिया कोणत्याचा इव्हेंटमध्ये सहभागी नव्हती. आता 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा' सानिया पहिल्यांदाच मनमोकळं करताना दिसणार आहे.

टॅग्स :कपिल शर्मा सानिया मिर्झाशोएब मलिक