Join us

सानिया मिर्झाने लिहिलेलं 'लव्ह लेटर' सोशल मीडियावर व्हायरल, तुम्ही वाचलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 18:41 IST

सानिया मिर्झाने लिहिलेलं 'लव्ह लेटर' सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे.

Sania Mirza Shared Love Letter: भारताची  टेनिस स्टार सानिया मिर्झाला कोणत्याही परिचयाची गरज नाही.  सानियाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर सानिया तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. आताही सानियानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सानिया मिर्झाने लिहिलेलं 'लव्ह लेटर' सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे.  तिने हे लेटर नेमकं कुणासाठी लिहलं आहे आणि त्यात काय आहे, याबद्दल आपण जाणून घेऊया. 

सानिया मिर्झा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.  सोशल मीडियावर पोस्ट करत सानिया चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता  सानिया हिने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याला तिनं 'लव्ह लेटर' असं नाव दिलं आहे. सानियाने हे 'लव्ह लेटर' कोणत्या व्यक्तीसाठी नाही तर, खेळाडूंसाठी लिहिलं आहे. 

सानियाने पोस्टमध्ये म्हटलं, "कायम तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा. पॅशन फॉलो करा. पैसा, प्रसिद्धी मिळेल, प्रवास करता येईल. पण खेळाला खेळापर्यंत ठेवणं, किती कठीण आहे हे कोणीही तुम्हाला सांगणार नाही. ज्यामुळे खेळाडुंच्या वाट्याला एकटेपणा देखील येतो. जेव्हा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडणार नाहीत, अडचणी येतील. तेव्हा विषेश लक्ष केंद्रीत करण्याची गरज भासते. खेळ आणि आयुष्य यांच्यातील ती रेषा मिटून जाते. कारण, खेळ हेच तुमचं आयुष्य बनतं". 

"थोडीशी सुट्टी घेतल्यावर तुमच्या मनात अपराधीपणाची भावना येते. तुम्ही पार्टी करत आहात म्हणून नाही तर तुमच्या खांद्यावर असलेल्या जबाबदारीच्या ओझ्याखाली तुमच्या रात्री मोठ्या होतात. अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो, वाढदिवस, मीत्र आणि प्रेम. तुम्ही जिंकल्यावर लोकांचा खोटेपणा तर हरल्यावर उदासीनता सामना करावा लागतो. एकिकडे सुसंस्कृत, संयमी आणि नियंत्रण असलेली व्यक्ती बनावं लागतं. तर दुसरीकडे आयुष्यात काय सुरू आहे, काय घडतंय, हे समजून घेण्याचे प्रयत्न सुरू असतात". 

"या प्रवासात मन हार मानतं, कधी विरोधात जातं, क्षमतेवर प्रश्न उभे राहतात. तुलाना आणि अपयशाला तोंड द्यावं लागतं. पण,  एक वेळ आल्यानंतर कळतं की पैसा, पुरस्कार नाही तर फक्त लोकांचं प्रेम हवं आहे आणि हेच फार कठिण आहे. पण खंबीर राहून धीर धरल्यास याच प्रवासात आयुष्या मार्गावर येतं". सानियाची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. सानियाने एका खेळाडूच्या आयुष्याचं अचूक वर्णन केल्याचं कमेंटमध्ये नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.  सानिया मिर्झा टेनिसमध्ये जागतिक क्रमवारीत एक नंबरला राहिलेली आहे. तिने २००३ वयाच्या १७ व्या वर्षी आपल्या करियरला सुरुवात केली होती. फेब्रुवारी २०१३ ध्ये तिने टेनिसमधून सन्यास घेतला होता. 

टॅग्स :सानिया मिर्झाइन्स्टाग्राम