Join us  

Sania Mirza Shoaib Malik: एकीकडे सानिया-शोएबच्या घटस्फोटाच्या चर्चा तर दुसरीकडे 'ते' फोटोज व्हायरल, नक्की चाललंय काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 4:01 PM

तुम्ही पाहिलेत का ते फोटो?

Sania Mirza Shoaib Malik: भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांची नावे सध्या चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शोएब आणि सानियाचे १२ वर्षांपासून असलेले नाते तुटणार असल्याचे बोलले जात आहे. पती-पत्नी आता वेगळे राहत असून त्यांच्यात ताटातूट होण्यासाठी पाकिस्तानी मॉडेल कारणीभूत ठरल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे ते लवकरच घटस्फोट (Divorce) घेणार असून कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यावर त्याबद्दल जाहीर करणार असल्याचेही सांगितले जात आहे. पण घटस्फोटाच्या अशा बातम्यांदरम्यान, शोएब आणि सानिया पहिल्यांदाच एकत्र दिसले. त्याचा फोटोही सोशल मीडियावर वेगाने व्हायरल (Photos Viral) होत आहे.

शोएब आणि सानियाला एकत्र पाहून चाहतेही खूश आहेत आणि दोघांमध्ये सर्व काही ठीक व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. त्याचबरोबर काही जण त्यावर टीकाही करत आहेत. काही युजर्सचे म्हणणे आहे की हा सर्व प्रकार शोच्या प्रमोशनसाठी केलेला पब्लिसिटी स्टंट होता. हे स्टार कपल लवकरच पाकिस्तानी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर एकत्र टेलिव्हिजन शो होस्ट करताना दिसणार आहे आणि शोच्या सेटवरील फोटो व्हायरल होत आहेत.

----

----

काही दिवसांपूर्वी शोएबने सानियासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला होता आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, सानियाने त्याच्या या पोस्टवर काहीच प्रतिसाद दिला नाही आणि त्यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आले आहे.

टॅग्स :सानिया मिर्झाशोएब मलिकघटस्फोटव्हायरल फोटोज्