'आई कुठे काय करते'मधील संजनाने मालिकेतून घेतला ब्रेक?, समोर आले मोठे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 01:46 PM2022-01-08T13:46:01+5:302022-01-08T13:46:49+5:30

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मधील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosle) हिने या मालिकेतून ब्रेक घेतला असल्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे.

Sanjana took a break from the series in 'Aai Kuthe Kay Karte'? | 'आई कुठे काय करते'मधील संजनाने मालिकेतून घेतला ब्रेक?, समोर आले मोठे कारण

'आई कुठे काय करते'मधील संजनाने मालिकेतून घेतला ब्रेक?, समोर आले मोठे कारण

googlenewsNext

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत सध्या लगीनघाई असून नुकतेच अभिषेक आणि अनघाचे लग्न पार पडले आहे. सध्या हे मनोरंजक असले तरी यात अनघाचा पहिला पती पुन्हा परत आला असून तिला तो त्रास देत असल्याचे आपण गेल्या काही भागांपासून पाहात आहोत. तरी अनघा आणि अभिषेकचे लग्न सोहळा पार पडल्यामुळे देशमुख कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान सध्या सोशल मीडियावर एक नवीनच चर्चा रंगत आहे. ती म्हणजे संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosle)हिने या मालिकेतून ब्रेक घेतला असल्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे ही चर्चा रंगली आहे.

रुपाली भोसले हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यात तिने म्हटले की, न्यू इयर न्यू वर्क, अर्थात नवीन वर्ष नवीन काम. या पोस्टमुळे सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. सध्या तरी रुपाली भोसले मालिकेत पाहायला मिळते आहे. त्यावरून ही चर्चा खरी असेल का? या संभ्रमात रुपाली भोसले अर्थात संजनाचा चाहतावर्ग आहे.


रुपाली भोसले एका नवीन प्रोजेक्टवर काम करत आहे. ती एका मराठी गाण्यात काम करते आहे. त्यामुळे तीने आई कुठे काय करते या मालिकेतून ब्रेक घेतला असल्याची चर्चा आहे. पण असे काही नसून रुपाली दोन्ही प्रोजेक्ट व्यवस्थितरित्या हाताळत असल्याचे सांगितले जात आहे. रुपाली हिने आई कुठे काय करते या मालिकेतून ब्रेक घेतल्याची निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले असून ती या मालिकेतून ब्रेक घेणार नाही.

Web Title: Sanjana took a break from the series in 'Aai Kuthe Kay Karte'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.