Join us

प्रतिक्षा संपली! याच महिन्यात रिलीज होणार आलिया-संजयचा 'सडक २', जाणून घ्या कधी आणि कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 13:10 IST

'सडक २' या सिनेमाच्या उत्सुकतेचं मुख्य कारण म्हणजे यात महेश भट्ट यांच्या दोन्ही मुली आलिया आणि पूजासहीत आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त दिसणार आहेत. आता याच महिन्यात हा सिनेमा रिलीज होणार आहे.

बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या महेश भट यांनी दिग्दर्शित केलेल्या 'सडक २' ची चर्चा बऱ्याच महिन्यांपासून रंगली आहे. या सिनेमाची उत्सुकताही प्रेक्षकांमध्ये बघायला मिळाली. आता हा सडक २ सिनेमा रिलीज करण्याची पूर्ण तयारी झाली आहे. या सिनेमाच्या उत्सुकतेचं मुख्य कारण म्हणजे यात महेश भट्ट यांच्या दोन्ही मुली आलिया आणि पूजासहीत आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त दिसणार आहेत. आता याच महिन्यात हा सिनेमा रिलीज होणार आहे.

बॉलिवूडच्या सर्वात जास्त उत्सुकता असलेल्या सिनेमांमध्ये 'सडक २' चा नंबर लागतो. पण कोरोनामुळे इतर सिनेमांप्रमाणे या सिनेमालाही फटका बसला. त्यामुळे हा सिनेमा आताा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे. सडक २ हा सिनेमा डिज्ने आणि हॉटस्टारवर रिलीज केला जाणार आहे. हा सिनेमा या महिन्याच्या शेवटी २८ ऑगस्टला रिलीज होणार आहे

या सिनेमात आलिया भट्ट, पूजा भट्ट, संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूरसोबतच गुलशन ग्रोवर सुद्धा या सिनेमात दिसणार आहे. 'सडक २' हा महेश भट्ट यांच्या 'सडक' सिनेमाचा सिक्वेल आहे. ज्यात पूजा भट्ट आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत होते.

'सडक २' सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यासंदर्भातील पत्रकार परिषेदत अभिनेत्री आलिया भट्ट म्हणाली की, हा खऱ्या अर्थाने तिच्यासाठी होमकमिंग सिनेमा आहे. हा सिनेमा करण्यासाठी संपूर्ण परिवार एकत्र राहिला आणि त्यामुळे सर्वांचे इमोशन्सही वेगवेगळ्या लेव्हलवर राहिले.

'सडक २'या सिनेमाची खासियत म्हणजे दिग्दर्शक महेश भट्ट हे तब्बल २० वर्षानी दिग्दर्शकाच्या भूमिकेत आलेत. तर दुसरी बाब म्हणजे आलिया भट्ट आणि पूजा भट्ट या दोन बहिणी पहिल्यांदाच एकत्र एका सिनेमात दिसणार आहे. 'सडक' या सिनेमाने चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. यातील गाणीही सुपरहिट झाली होती. आता इतकी मोठी स्टार कास्ट असल्यावर हा सिनेमा प्रेक्षकांना किती आवडतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

हे पण वाचा :

 कंगना राणौत बनवणार राम मंदिरावर भव्यदिव्य सिनेमा, नावाचीही केली घोषणा

खुशखबर! पुन्हा थिएटर्समध्ये होणार धमाका, सुपरस्टार प्रभास 'बाहुबली ३' च्या तयारीत?

टॅग्स :सडक 2बॉलिवूडसंजय दत्तआलिया भटमहेश भटआदित्य रॉय कपूरपूजा भट