Join us

मुन्नाभाई-सर्किट जोडी परत येतेय ! 'मुन्नाभाई ३' की आणखी कोणता सिनेमा? चाहत्यांमध्ये उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 14:57 IST

मुन्नाभाई आणि सर्किट जोडीने सर्वांनाच खळखळून हसवले. या जोडीला पुन्हा पडद्यावर पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

२००३ मध्ये आलेल्या मुन्नाभाई आणि सर्किट जोडीने सर्वांनाच खळखळून हसवले. राजकुमार हिरानी यांचा 'मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमा चांगलाच हिट झाला. तेही मु्न्ना-सर्किट या जोडीमुळे. या जोडीला पुन्हा पडद्यावर पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. मग तुमची ही इच्छा पूर्णच झाली म्हणून समजा. तर आता चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. संजय दत्त आणि अर्शद वारसीच्या आगामी सिनेमाचा फर्स्ट लुक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

२००६ मध्ये मुन्नाभाई सिरीजचा 'लगे रहो मुन्नाभाई' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता तब्बल १६ वर्षांनी ही संजय दत्त (Sanjay Dutt) आणि अर्शद वारसी (Arshad Warsi) ही जोडी पडद्यावर धम्माल करायला येत आहे. आता हा 'मुन्नाभाई ३' आहे की दुसराच कोणता चित्रपट आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संजय दत्तने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले, 'तुमच्यापेक्षा आम्ही जास्त वाट पाहिली आहे. पण आता प्रतिक्षा संपली आहे. भाई अर्शद सोबत मी आगामी सिनेमा घेऊन येत आहे.'

सिनेमाच्या पोस्टरमध्ये संजय दत्त आणि अर्शद वारसी दोघेही तुरुंगात आहेत. त्यांनी आरोपींचे कपडे घालत आहेत. दोघांच्या चेहऱ्यावर चिंताग्रस्त भाव आहेत. संजय दत्तने सिनेमाची निर्मिती केली असून सिद्धांत सचदेव यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. याच वर्षी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. आता हा नक्की कोणता सिनेमा आहे याची उत्सुकता चाहत्यांना आहे. पण ते काहीही असो ही जोडी कोणत्याही माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा हसवायला येत आहे हेच खूप आहे.

टॅग्स :बॉलिवूडसिनेमासंजय दत्तअर्शद वारसी