संजय दत्त आणि जुही चावला हे दोघेही त्यांच्या काळातील टॉप स्टार होते. संजय दत्तने खलनायक, वास्तव, मुन्नाभाई एमबीबीएस सारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली, तर जुही चावला देखील अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. दोघांची जोडी 1999 मध्ये पहिल्यांदा 'सफारी' चित्रपटात एकत्र झळकली होती. 1999 मध्ये रिलीज झालेल्या सफारीचे दिग्दर्शन ज्योतिन गोयल यांनी केले होते. पण, 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे काम 1992 मध्येच सुरू झाले होते, हे फार कमी लोकांना माहिती आहे.
जुही चावला आणि संजय दत्त यांच्या जोडीचा 'सफारी' चित्रपट बनायला 7 वर्षे लागली. हा चित्रपट 1992 मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये संजय-जुही सोबत सुरेश ओबेरॉय, तनुजा आणि मोहनीश बहल सारखे स्टार्स देखील महत्त्वाच्या भूमिकेत होते. हा चित्रपट प्रदर्शित होण्यास उशीर होण्यामागची अनेक कारणे होती. यातील दोन मुख्य कारणांबद्दल बोलायचे झाले तर, संजू बाबाला झालेली अटक आणि 1996 मध्ये शफी इनामदार यांचे आकस्मिक निधन.
या चित्रपटाचे शूटिंग 1992 मध्ये सुरू झाले होते आणि संजय दत्तच्या अटकेमुळे ते थांबवण्यात आले होते. त्यानंतर 1996 मध्ये चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या शफी इनामदार यांच्या निधनानंतर सुरेश ओबेरॉय यांनी चित्रपटात त्यांची जागा घेतली. कसाबसा हा चित्रपट 1999 मध्ये प्रदर्शित झाला. निर्मात्यांना या सिनेमाकडून खूप आशा होत्या, त्यांची निराशा झाली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.
मात्र, याआधीही संजय दत्त आणि जुही चावला यांनी ज्योतिन गोयलच्या एका चित्रपटात काम केले होते. या दोघांनी 1990 मध्ये रिलीज झालेल्या “जहरीले” मध्ये एकत्र काम केले होते, पण या चित्रपटात त्यांच्यासोबत इतर कलाकार होते. सफारीनंतर जुही चावला आणि संजय दत्त 13 वर्षांनंतर पुन्हा एकदा “सन ऑफ सरदार” मध्ये एकत्र दिसले. या चित्रपटात अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत होते.