Join us

संजय दत्त नाहीच तर हे दोन अभिनेते होते 'खलनायक'साठी पहिली चॉईस, पण सुभाई घईंनी असं बदललं संजूबाबचं नशीब

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 9:49 AM

आजही खलनायक म्हटलं की, लोकांना संजय दत्तची ही भूमिका आठवते.

सुभाष घई यांच्या ‘खलनायक’ चित्रपटाने संजय दत्तचं करिअर एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. हा सिनेमा प्रचंड गाजला होता. नायक नहीं खलनायक हूं मैं हे या सिनेमातील गाणं विशेष लोकप्रिय झालं.'खलनायक' सिनेमाला ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. सुभाष घई यांच्या नुकताच झालेल्या वाढदिवसानिमित्त खलनायक सिनेमातीन कलाकार पुन्हा एकत्र आले होते. माधुरी दीक्षित, तिचे पती श्रीराम नेने, जॅकी श्रॉफ, संजय दत्त, अनुपम खेर एकत्र आले. संजय दत्त आणि माधुरी दीक्षितला एकत्र पाहून चाहत्यांना तर विश्वासच बसला नाही. सर्वांनाच खलनायकची आठवण झाली. 

'खलनायक 2' येणार अशा चर्चा मध्यंतरी जोर धरुन होत्या. मात्र अद्याप यावर अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या सिनेमा संबंधीत एक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

खलनायक हा दिग्दर्शक सुभाष घई यांच्या करिअरमधील फार महत्वाचा सिनेमा. या सिनेमांची स्क्रीप्ट तयार असल्याचे सुभाच घई यांनी सांगितले होते. इतकेच नाही तर संजय दत्त हा खलनायकमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. यातील बल्लूची भूमिका संजयने अफलातून साकारली आहे. आजही खलनायक म्हटलं की, लोकांना संजय दत्तची ही भूमिका आठवते. पण अनेकांना या भूमिकेची एक मजेदार बाब माहीत नाही. तुम्हाला विश्वास बसणार नाही की, या भूमिकेसाठी सुभाष घई यांची पहिली पसंत संजय दत्त नव्हताच. बल्लूच्या भूमिकेसाठी तीन अभिनेत्याने नकार दिल्यानंतर ही भूमिका संजय दत्तकडे आली. 

सुभाष घई यांची इच्छा होती ही भूमिका आमिर खानने साकारावी पण तो नेगेटीव्ह भूमिका करण्याचा मूडमध्ये नव्हता. त्याने या भूमिकेसाठी नकार दिला. आमिरने नकार दिल्यानंतर या भूमिकेसाठी नाना पाटेकर यांना विचारण्यात आलं. नाना पाटेकर यांचं नाव फायनल करुन सुभाष घईनी यावर काम देखील सुरु केलं होतं, असा खुलासा त्यांनी एक मुलाखतीत केला होता. चित्रपटाची कथा जसजशी फायनल होत गेली. तेव्हा लक्षात आलं की नाना पाटेकर हे याभूमिकेत फिट बसत नसल्याचं निर्मात्यांच्या लक्षात आलं. यानंतर जाऊन संजय दत्तला ही भूमिका ऑफर करण्यात आली

टॅग्स :संजय दत्तसुभाष घई