Join us

हा अभिनेता आहे गुलशन ग्रोव्हरचा बेस्ट फ्रेंड, त्याच्या नावावरून ठेवले आहे मुलाचे नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 7:44 PM

बॉलिवूडमधील एक अभिनेता गुलशनचा बेस्ट फ्रेंड असून त्याच्या सुख दुःखात तो नेहमीच सहभागी असतो. त्याने त्याच्याच नावावरून त्याच्या मुलाचे नाव ठेवले आहे.

ठळक मुद्देत्याच्या या मित्राचे नाव संजय दत्त असून संजय आणि गुलशन यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. संजय आणि गुलशनच्या मैत्रीचे किस्से चांगलेच प्रसिद्ध असून गुलशनने अनेक मुलाखतीत देखील याविषयी सांगितले आहे. 

पडद्यावर ‘बॅड मॅन’ अशी प्रतिमा तयार होऊनही खऱ्या आयुष्यात ‘गुड मॅन’ असलेला अभिनेते गुलशन ग्रोव्हरच्या ‘बॅड मॅन’ या आत्मचरित्राचे प्रकाशन नुकतेच झाले. गुलशन ग्रोव्हरचा अख्खा जीवनप्रवास या पुस्तकात रेखाटण्यात आला आहे. चारशेहून अधिक चित्रपट आणि बहुतांश चित्रपटांमध्ये साकारलेल्या खलनायकाच्या भूमिका साकारणाऱ्या गुलशन ग्रोव्हरने चित्रपटसृष्टीत स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. त्याच्या अनेक भूमिका चांगल्याच गाजल्या. पण गुलशनचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. एकेकाळी या अभिनेत्याने घर चालवण्यासाठी डिटर्जंट पाऊडर, फिनाईलच्या गोळ्या देखील विकल्या आहेत.

गुलशन ग्रोव्हर गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कार्यरत असून त्याने या कालावधीत बॉलिवूडमध्ये अनेक फ्रेंड्स बनवले आहेत. पण बॉलिवूडमधील एक अभिनेता हा त्याचा बेस्ट फ्रेंड असून त्याच्या सुख दुःखात तो नेहमीच सहभागी असतो. त्याने त्याच्याच नावावरून त्याच्या मुलाचे नाव ठेवले आहे. त्याच्या या मित्राचे नाव संजय दत्त असून संजय आणि गुलशन यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. संजय आणि गुलशनच्या मैत्रीचे किस्से चांगलेच प्रसिद्ध असून गुलशनने अनेक मुलाखतीत देखील याविषयी सांगितले आहे. 

गुलशनचा घटस्फोट झाल्यानंतर त्याने त्याचा मुलगा संजयचे पालनपोषण एकट्यानेच केले. संजय सध्या हॉलिवूडमध्ये काम करत असून तेथील अनेक स्टुडिओसोबत त्याने आजवर काम केले आहे. तो चित्रपटांच्या प्रोडक्शनचे काम पाहातो. हॉलिवूडमध्ये त्याचे चांगले संबंध असल्याने बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांच्या हॉलिवूड प्रोजेक्टसाठी संजयचा सल्ला घेतात.

काही दिवसांपूर्वी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत गुलशन ग्रोव्हरने आपल्या गरीबीच्या दिवसांतील अनेक आठवणी सांगितल्या होत्या. त्याने म्हटले होते की, ‘मी माझ्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिलेत. माझे लहानपण अतिशय गरीबीत गेले. मला आजही आठवते, माझी शाळा दुपारची असायची. पिशवीत शाळेचा गणवेश टाकून मी भल्या पहाटे घरून निघायचो आणि घरोघरी डिटर्जंट पाऊडर विकायचो. शाळेचा खर्च भागवण्यासाठी मी फिनाईलच्या गोळ्याही विकल्या. पण मी गरीबीला कधीच घाबरलो नाही. याचे कारण म्हणजे माझे वडील.

टॅग्स :गुलशन ग्रोव्हरसंजय दत्त