Join us

संजय-गौरीच्या प्रेमाचा ताटवा

By admin | Published: May 05, 2017 5:12 AM

म राठी रूपेरी पडद्यावर ज्या नव्या आणि फ्रेश जोड्यांनी पाऊल ठेवले, त्यांना सिनेरसिकांनी उचलून धरले आहे. अशीच एक फ्रेश जोडी शरयू

म राठी रूपेरी पडद्यावर ज्या नव्या आणि फ्रेश जोड्यांनी पाऊल ठेवले, त्यांना सिनेरसिकांनी उचलून धरले आहे. अशीच एक फ्रेश जोडी शरयू आर्ट प्रोडक्शन निर्मित ‘ताटवा’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने 26 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता संजय शेजवळ आणि अभिनेत्री गौरी कोंगे या दोघांची लव्ह केमिस्ट्री ताटवामध्ये रंगणार आहे. या चित्रपटाची निर्मिती डॉ. शरयू पाझारे यांनी केली असून या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी केले आहे. प्रेमाचा अनवट आणि अनोखा पैलू शोधू पाहणारी लिखित आणि शिल्पाची निस्वार्थ, निखळ प्रेमकहाणी ताटवाच्या निमित्ताने सिनेरसिकांच्या भेटीला येत आहे. उत्तम चित्रकार आणि शिल्पकार असलेला लिखित म्हणजेच संजय शेजवळ आणि खेळणी बनवून उदरनिर्वाह आणि शिक्षण पूर्ण करणारी शिल्पा म्हणजेच गौरी कोंगे हे दोघेही त्यांच्यात असलेल्या सामाजिक दरीची पर्वा न करता एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यांच्या प्रेमाचा हा प्रवास नेमके काय वळण घेतो याची हृदयस्पर्शी कथा ताटवा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ताटवाच्या निमित्ताने संजय आणि गौरी यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे. आमची या चित्रपटातील केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडेल, असा विश्वास त्यांनी या भूमिकेबद्दल बोलताना व्यक्त केला आहे आणि प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहण्याचे आवाहन देखील प्रेक्षकांना केले आहे. संजय शेजवळ आणि गौरी कौंगे या नव्या कलाकार जोडीसोबत अरुण नलावडे, डॉ. शरयू पाझारे, देवेंद्र दोडके, डॉ. सरिता घरडे, विक्रांत बोरकर, नूतन धवणे, शीतल राऊत, सदानंद बोरकर, कमलाकर बोरकर, मंजुषा जोशी आणि बालकलाकार गौरी हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाची कथा एम. कंठाळे यांनी लिहिली असून संवादलेखनाचे काम डॉ. शरयू पाझारे, सरिता घरडे, सुरेश कांबळे, शैलेश ठावरे यांनी केले आहे. ज्येष्ठ छायाचित्रकार इम्तियाज बारगीर यांनी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली असून बी. म्हन्तेश्वर आणि रोहन सरोदे यांनी चित्रपटाचे संकलन केले आहे. चित्रपटाची सहनिर्मिती विशाल रामटेक आणि स. कोंडबत्तुलवार यांनी केली आहे तर चित्रपटाचे कार्यकारी निर्माते विवेक कांबळे आहेत.