दमदार अभिनयशैलीच्या जोरावर बॉलिवूडचा एक काळ गाजवणारा अभिनेता म्हणजे संजय खान (sanjay khan). एक फूल दो माली, अब्दुल्ला यांसारख्या सिनेमातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. संजय खान यांच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक चढउतार आले. बॉलिवूडचे पोस्टर बॉय या नावने लोकप्रिय असलेल्या संजय खान यांचं ‘द बेस्ट मिस्टेक्स ऑफ माय लाइफ’ (The Best Mistakes of My Life) हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं. या आत्मचरित्रामध्ये त्यांनी त्यांच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल आयुष्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यामध्येच त्यांचा एक गंभीर अपघात झाल्याचं नमूद केलं आहे. या अपघातामध्ये त्यांच्या शरीरावर ७३ सर्जरी कराव्या लागल्या होत्या.
'टीपू सुल्तान' या सिनेमाच्या सेटवर एकदा भीषण आग लागली होती. या आगीमध्ये संजय खान होरपळून निघाले होते. इतकंच नाही तर २००३ मध्ये एका हेलीकॉप्टर दुर्घटनेमध्ये त्यांना गंभीर इजा झाली होती. या दोन्ही अपघातामुळे त्यांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल दोन्ही आयुष्यावर त्याचा बराच परिणाम झाला होता.
८ फेब्रुवारी १९८९ मध्ये मैसूरमधल्या प्रीमियर स्टुडिओमध्ये द स्वॉर्ड ऑफ टीपू सुल्तान या सिनेमाचं शुटिंग सुरु होतं. हे शूट सुरु असतानाच सेटवर भीषण आग लागली. या आगीमध्ये ते थर्ड डिग्रीपर्यंत भाजले गेले होते. या अपघातानंतर त्यांच्यावर ७३ सर्जरी करण्यात आल्या. सुदैवाने ते या अपघातातून थोडक्यात बचावले. मात्र, त्यांच्या मागील अपघातांचं चक्र काही कमी झालं नाही.
२००३ मध्ये सुद्धा त्यांच्यासोबत अशी एक दुर्घटना घडली. संजय खान,विजय माल्या यांच्यासोबत एका राजकीय प्रचारासाठी कर्नाटकच्या बलखोट येथे हॅलिकॉप्टरने गेले होते. हे हॅलिकॉप्टर लँड होत असतानाच त्याची मागची बाजू तुटली आणि ते जमिनीच्या दिशेने वेगाने खाली येऊ लागलं. या हॅलिकॉप्टवर नियंत्रण मिळवणं पायलटलाही अशक्य झालं होतं. पण, सुदैवाने या अपघातामधूनही ते बचावले. परंतु, त्यांना गंभीर दुखापत झाली होती.
दरम्यान, संजय खान यांचा कलाविश्वातील वावर आता कमी झाला आहे. मात्र, ते सोशल मीडियावर सक्रीय आहेत. तसंच बऱ्याचदा ते बॉलिवूड पार्टी, पुरस्कार सोहळे यांसारख्या कार्यक्रमांना हजेरी लावत असतात.