Join us

“हॅलो बाळासाहेब… तुम्हाला अपेक्षित असेलेली शिवसेना पुन्हा उभी करू”; संजय राऊतांचा शब्द

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 10:44 AM

Sanjay Raut Call to Balasaheb Thackeray: ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात थेट बाळासाहेब ठाकरे यांना फोन लावत संजय राऊत यांनी काही तक्रारी केल्या.

Sanjay Raut Call to Balasaheb Thackeray: वर्षभरापूर्वी शिवसेनेत ऐतिहासिक बंडखोरी झाली. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांना घेऊन उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केले. भाजपशी हात मिळवणी केली अन् शिंदे-फडणवीस सरकार राज्यात स्थापन झाले. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट असे दोन गट निर्माण झाले. या बंडाबाबतची तक्रार खासदार संजय राऊत यांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे केली. तसेच तुम्हाला अपेक्षित असेलेली शिवसेना पुन्हा उभी करू, असे शब्द दिला. 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात संजय राऊत सहभागी झाले आहेत. यावेळी संजय राऊतांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांना फोन लावला.

‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात एका सेगमेंटमध्ये तुम्हाला हव्या असलेल्या व्यक्तीला तुम्हाला फोन लावण्याची संधी मिळते. हा फोन काल्पनिक असतो. त्यामुळे तुम्ही हयात असलेल्या किंवा नसलेल्या व्यक्तीला हा फोन लावू शकता. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अवधूत गुप्ते यांनी तुम्ही कुणाला फोन लावाल, असा प्रश्न विचारला. तेव्हा संजय राऊतांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांना फोन लावला. या फोनमध्ये त्यांनी काही तक्रारी केल्या. तर काही आश्वासनं दिली आहेत.

तुम्हाला अपेक्षित असेलेली शिवसेना पुन्हा उभी करू

हॅलो बाळासाहेब, तुम्ही आम्हा लोकांना सांगितले की शिवसेना सत्तेसाठी जन्माला आलेली नाही. ज्या धनुष्यबाणाची आपण पूजा करत होता. तो धनुष्यबाण स्वत:ला महाशक्ती म्हणवणाऱ्यांनी चोरला. पण तुम्ही खात्री बाळगा. आमचा कणा अजून मोडलेला नाही. तुम्हाला अपेक्षित असेलेली शिवसेना तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. एक वाक्य तुम्ही नेहमी शिवसैनिकांना सांगायचा की आपण सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही. तर सत्ता आपल्यासाठी जन्माला आलेली आहे. असे तुम्ही आम्हाला कायम सांगितले. ते ध्यानात ठेवून आम्ही वाटचाल करू, असे वचन संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंना दिले.

दरम्यान, भाजपचे खासदार नारायण राणे यांना खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात बोलावण्यात आले होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले, नारायण याला खासदार करायचे आपल्याला. मी फक्त त्यांचा शब्द पूर्ण केला, असे ते म्हणाले होते. नारायण राणे यांच्या टीकेलाही संजय राऊतांनी उत्तर दिले आहे. हे महाशय खोटे बोलत आहेत. त्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर त्यांची खासदारकी जाऊ शकते, असा दावा संजय राऊतांनी केला. 

 

टॅग्स :संजय राऊतटेलिव्हिजनबाळासाहेब ठाकरे