Join us

खुलासा! पहिल्यांदाच रणबीरने सांगितले किती मुलींना केलं डेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 5:18 PM

रणबीर कपूरने खऱ्या आयुष्यातही अनेक अभिनेत्रींना डेट केलंय हे सर्वांनाच माहीत आहे. त्याच्या या यादीत सोनम कपूर, दीपिका पदुकोन आणि कतरिना कैफचा समावेश आहे.

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर याच्या अभिनयाचे, त्याच्या लुक्सचे लाखोंच्या संख्येने चाहते आहेत. त्याच्या चाहत्यांमध्ये महिलांची संख्या अधिक असल्याचं नेहमीच बघायला मिळतं. रणबीर कपूरचे सिनेमे गाजण्यासोबतच त्याची अफेअर्सही चांगली गाजली आहेत. 

रणबीर कपूरने खऱ्या आयुष्यातही अनेक अभिनेत्रींना डेट केलंय हे सर्वांनाच माहीत आहे. त्याच्या या यादीत सोनम कपूर, दीपिका पदुकोन आणि कतरिना कैफचा समावेश आहे. सध्या तो आलिया भटला डेट करत असल्याची चर्चा रंगलीये. पण आत्तापर्यत त्याने किती मुलींना डेट केलंय हे तुम्हाला माहीत आहे का? नाही ना? पण याचा खुलासा त्याने स्वत: केलाय. 

रणबीरच्या संजू या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. यावेळी बोलताना त्याने सांगितले की, संजय दत्तने 308 मुलींना डेट केलंय आणि हा सिनेमा त्यांचा बायोपिक आहे. ट्रेलर लॉन्चवेळी रणबीरनेच आत्तापर्यंत किती मुलींना डेट केलंय याचा खुलासा केलाय.

यावर त्याला विचारण्यात आले की, आत्तापर्यत तू किती मुलींना डेट केलंय? आणि तुझा बायोपिक येणार का? यावर रणबीर म्हणला की, मी कधीही माझा बायोपिक करण्याची परवानगी देणार नाही. आणि आत्तापर्यंत माझ्या केवळ10 गर्लफ्रेन्ड्स होत्या. त्यामुळे माझा बायोपिकही मनोरंजक होणार नाही. 

आता हे सर्वांनाच माहीत आहे की, त्याच्या 10 पैकी 4 गर्लफ्रेन्ड या बॉलिवूड अभिनेत्री आहेत. त्यासोबतच असे म्हटले जाते की, रणबीरने कॉलेजच्या दिवसात इमरान खानची पत्नी अवंतिका मलिकला डेट केलं होतं. बाकी पाच मुलींबद्दल जाणून घेणं रोमांचक असेल. पहिल्यांदाच रणबीरने अशाप्रकारे किती मुलींना डेट केलं हे सांगितलं. 

टॅग्स :रणबीर कपूरबॉलिवूड