Join us

'महिलांसाठी दिल्ली सुरक्षित नाही'; 'दंगल गर्ल' सान्या मल्होत्राचं वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 16:39 IST

Sanya malhotra: सान्या मल्होत्रा दिल्लीत लहानाची मोठी झाली आहे. तिचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणदेखील तेथेच झालं आहे.

Sanya Malhotra On Delhi: दंगल गर्ल सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) सध्या तिच्या आगामी ‘हिट – द फर्स्ट केस’  या चित्रपटामुळे चर्चेत येत आहे. नुकताच तिचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सध्या तिची चित्रपटाच्या प्रमोशनमधील एक मुलाखत चर्चेत येत आहे. अलिकडेच या प्रोमोशनच्या निमित्ताने तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने दिल्लीपेक्षा मुंबई जास्त सेफ असल्याचं म्हटलं.

अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत 'तू मूळची दिल्लीची असूनही जास्तीत जास्त वेळ मुंबईत का राहतेस?'  असा प्रश्न तिला विचारला होता. या प्रश्नावर तिने थक्क करणारं उत्तरं दिलं. तिचं उत्तर ऐकल्यावर सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या.

"मी मूळची दिल्लीची आहे. पण, मला दिल्लीपेक्षा मुंबई जास्त आवडते. मुंबईत मला जास्त सुरक्षित असल्याची भावना येते. मला माहित नाही दिल्लीतील वातावरणात सुधारणा झालीये की नाही. पण, मला तिथे अजिबात सुरक्षित वाटत नाही. या असुरक्षिततेचं नेमकं कारणंही मी सांगू शकत नाही. दिल्लीत एकही अशी महिला नसेल जिने छेडछाड, विनभंग अशा प्रसंगांना तोंड दिलं नसेल", असं सान्या म्हणाली.

दरम्यान, सान्या मल्होत्रा दिल्लीत लहानाची मोठी झाली आहे. तिचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणदेखील तेथेच झालं आहे. सान्या लवकरच ‘हिट: द फर्स्ट केस’ मध्ये आहे. त्यानंतर ती वर्जन शाहरुख खानसोबत ‘जवान’ मध्ये स्क्रीन शेअर करणार आहे. 

टॅग्स :सान्या मल्होत्राबॉलिवूडसिनेमा