बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'जवान'नंतर तिच्या आगामी 'मिसेस' चित्रपटामुळे चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सान्या या चित्रपटासाठी चर्चेत आहे. 'द ग्रेट इंडियन किचन' या मल्याळम सिनेमाची ही हिंदी आवृत्ती आहे. या चित्रपटात सान्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या टीझरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. सान्या मल्होत्राचा 'मिसेस' २०२४ च्या हवाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (HIFF) प्रदर्शित करण्यात येणार आहे. सान्या या चित्रपटात एक वेगळी भूमिका साकारणार असून संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठी ही अभिमानाची बाब आहे
लेखिका चित्रपट निर्मात्या आरती कडव दिग्दर्शित, 'मिसेस', जो मल्याळम चित्रपट 'द ग्रेट इंडियन किचन'चा रिमेक आहे. यात सान्याने एका विवाहित महिलेची भूमिका साकारली आहे जी घरगुती जबाबदाऱ्यांनी भरलेल्या व्यस्त वेळापत्रकात स्वतःची ओळख टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करत आहे. तिने साकारलेले हे पात्र प्रेक्षकांना नक्कीच आवडणार आहे यात शंका नाही. हवाई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या लाइनअपमध्ये मिसेसचा समावेश असणं हे नक्कीच खास आहे. इतकंच नाही तर या चित्रपटाने प्रतिभावान अभिनेत्रीच्या अष्टपैलूत्वाची सिद्धता दाखवून तिच्या उत्कृष्ट चित्रपटचित्रणातही भर घातली आहे. यापूर्वी हा चित्रपट पाम स्प्रिंग्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही गेला होता. सान्या मल्होत्राचा उत्कृष्ट अभिनय, चित्रपटाच्या वेधक कथाकथन हा चित्रपट खास ठरतोय.
'मिसेस' चित्रपटात सान्या मल्होत्रा, निशांत दहिया आणि कंवलजीत सिंग मुख्य भूमिकेत आहेत. ज्योती देशपांडे, पम्मी बावेजा आणि हरमन बावेजा सहनिर्माते आहेत. आरती कडव दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन अनु सिंग चौधरी, हरमन बावेजा आणि आरती कडव यांनी केले आहे.