गेल्या काही दिवसांपासून अशी बातमी आली होती की निर्माता साजिद नाडियाडवालाने सारा अली खानला घेऊन 'हीरोपंती 2' बनवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सुशांत सिंग राजपूत संबंधित असलेल्या ड्रग चॅट प्रकरणात एनसीबीने सारा अली खानला समन्स बजावल्यामुळे साराचे नाव सिनेमातून काढून टाकण्यात आले.
'बॉलिवूड हंगामा'च्या रिपोर्टनुसार, साजिदने सारा अली खानला आपल्या सिनेमात घेण्याचे आश्वासन पूर्ण केले आहे. तिला आणखी एक मोठा सिनेमा ऑफर केला. टायगर श्रॉफसह सारा अली खानला 'बागी 4' मध्ये कास्ट केल्याची बातमी आहे. साजिदने सिनेमातील फिमेल लीडसाठी साराचे नाव फायनल केले आहे. खरं तर साराला 'हिरोपंती 2' मध्ये घ्यायचा होता पण तारा सुतारियाला तिच्या जागी घेण्यात आले.