करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan ) या चॅट शोचा प्रत्येक सीझन चर्चेत असतो. आता सीझन ८ देखील खूप चर्चेत आला आहे. शोच्या तिसऱ्या पर्वात सारा अली खान (Sara Ali Khan) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) दिसल्या होत्या. दोघांनी सेटवर एकत्र खूप धमाल केली. सोशल मीडियावरही या एपिसोडची जोरदार चर्चा होत आहे. 'कॉफी विथ करण ८' च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये दोन्ही अभिनेत्रींनी अनेक गुपिते उघड केली.
शोच्या तिसऱ्या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाल्यापासून सारा आणि अनन्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. दरम्यान, अनन्या पांडेनेहीसारा अली खानशी संबंधित एक मजेदार किस्सा शेअर केला आहे. हे ऐकून चाहत्यांनाही हसू आलं. पहाटे ३ वाजता सारा तिला चौपाटीवर कशी घेऊन गेली हे अभिनेत्रीने सांगितले. मात्र, त्यादरम्यान पोलिसांनी त्यांची गाडी अडवली आणि त्यांना तिथे जाऊही दिले नाही.
अनन्या-सारा दुपारी ३ वाजता चौपाटीवर पोहोचल्याकॉफी विथ करण सीझन ८च्या प्रोमोमध्ये, अनन्या पांडेने सारा अली खानशी संबंधित एक मजेदार घटना शेअर केली आहे. ती सांगते की करण जोहर पार्टीतून निघाल्यावर सारा तिला पहाटे ३ वाजता चौपाटीवर घेऊन गेली. जवळपास सकाळ झाली होती. त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या पोलिसांनी दोघींना आत जाऊ देण्यास नकार दिला होता. तिचा मुद्दा पोलिसांपर्यंत पोहोचवण्यासाठी साराने त्यांना सांगितले होते की, बघा, अनन्या पांडे कारमध्ये बसली आहे. आम्हाला जाऊ द्या.
सारा अनन्याचा सल्ला घेतेसारा अली खानने देखील करणच्या शोमध्ये अनन्याबद्दल अनेक खुलासे केले आणि असेही सांगितले की ती अनेकदा अनन्याकडून फोनवर सल्ला घेते. अनन्या नेहमीच तिला प्रत्येक प्रसंगात खूप मदत करते. तिला जिथे गरज असते तिथे ती तिला साथ देते. अनन्याच कुठे काय बोलायचंय आणि कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे ते देखील सांगते.