‘माझी आई पॉर्न साईट चालवतेय, असं वाटायचं...’; सारा अली खान असं का म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 10:25 AM2021-11-03T10:25:25+5:302021-11-03T10:31:50+5:30
Sara Ali Khan : माझी आई त्या 10 वर्षात हसणं विसरली होती...; अमृता आणि सैफच्या घटस्फोटावरही केला खुलासा
सैफ अली खान (Saif Ali Khan) व अमृता सिंगची (Amrita Singh) लाडकी लेक सारा अली खानला (Sara Ali Khan) लपवाछपवी फारसी आवडत नाही. म्हणूनच पर्सनल लाईफबद्दल ती अगदी बिनधास्त बोलते. अगदी आई-वडिलांचा घटस्फोटावर बोलतानाही ती कचरत नाही. सारा अगदी लहान असताना सैफ व अमृताचा घटस्फोट झाला. याकाळातील आई-वडिलांचे ताणलेले संबंध तिनं बघितले आहेत. घटस्फोटानंतर विशेषत: तिच्या आईच्या आयुष्यातील बदलांचीही ती साक्षीदार आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच एका ताज्या मुलाखतीत सारा बोलली. याशिवाय आई-वडिल कधीकाळी मला फार निगेटीव्ह वाटायचे. आई तर पॉर्न साइट चालवतेय असंच वाटायचं,असेही ती म्हणाली
आई एक पॉर्न साईट चालवते असं वाटायचं...
एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत सारा म्हणाली, ‘मला आजही आठवते आई-बाबांचे ओकांरा (Omkara)आणि कलयुग (Kalyug) हे दोन सिनेमे पाहिल्यानंतर मी डिस्टर्ब झाले होते. माझे आई-बाबा अतिशय निगेटीव्ह लोक आहेत, असं मला वाटलं होतं. ओकांरा पाहिल्यानंतर माझे वडिल शिव्याशाप देतात, असं माझं मत झालं होतं आणि कलयुग पाहिल्यानंतर माझी आई एक पॉर्न साइट चालवते, असं माझं मत झालं होतं. आज हसायला येतं. पण त्या वर्षी निगेटीव्ह रोलसाठी त्या दोघांनाही बेस्ट अॅक्टरसाठी नॉमिनेट केलं गेलं होतं. हे काय सुरू आहे, असं मला तेव्हा वाटलं होतं.’
तुम्हाला आठवत असेलंच की, ओकांरा या चित्रपटात सैफने लंगडा त्यागीची भूमिका साकारली होती. तर कलयुग या चित्रपटात अमृता निगेटीव्ह भूमिकेत होती.
माझी आई त्या 10 वर्षात हसणंच विसरली होती...
या मुलाखतीत साराला तिच्या आई-वडिलांच्या घटस्फोटाबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ती म्हणाली, ‘मी 9 वर्षांची होते आणि त्या वयातही प्रगल्भ झाले होते. माझे आईबाबा एकत्र आनंदी नाहीत, हे मला कळतं होतं. पुढे त्यांचा घटस्फोट झाला आणि मी त्यांच्या चेहºयावर आनंद बघितला. माझी आई त्याआधी 10 वर्षात हसणंच विसरली होती. पण अचानक ती फार आनंदी राहू लागली. ती सुंदर दिसू लागली. त्यामुळे त्यांचा घटस्फोट होणं माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती. माझे आई-वडील वेगळे होऊन आनंदात राहत असतील तर मग मी दु:खी का होऊ? माझी आई अमृता आणि वडील सैफ अली खान यांचा वेगळे होण्याचा निर्णय हा योग्य वेळी घेतलेला होता.
अमृता आणि सैफने 1991 साली लग्नं केलं होतं. दोघांना सारा आणि इब्राहिम अशी दोन मुलं झाली. पण यादरम्यान दोघांच्या नात्यातील मतभेद वाढला होता. अखेर 2004 मध्ये सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाला. 2012 साली सैफनेअभिनेत्री करीना कपूरसोबत विवाहबंधनात अडकला.