Join us

Sara Ali Khan Gaslight Trailer: सस्पेन्स, थ्रील अन् गॅसलायटिंग..., अली खानच्या ‘गॅसलाइट’चा रहस्यमय ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 12:21 PM

Sara Ali Khan Gaslight Trailer: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा (Sara Ali Khan) 'गॅसलाईट' (Gaslight) हा सिनेमा येत्या ३१ मार्चला रिलीज होतोय. आज या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला.

Sara Ali Khan Gaslight Trailer: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा (Sara Ali Khan) 'गॅसलाईट' (Gaslight) हा सिनेमा येत्या ३१ मार्चला डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होतोय. आज या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला.गॅसलाईट' या सीरिजमध्ये सारा ही मिशा नावाच्या दिव्यांग मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर तिच्या आईच्या भूमिकेत चित्रागंदा आहे.मिशा एका हवेलीत येते. रूक्मिणी तिचं स्वागत करते. ती कदाचित मिशाची सावत्र आई आहे. हवेलीत आल्यावर मिशाची वेगवेगळ्या लोकांशी ओळख होते. राजा साहेबांचा जवथचा विक्रांत मेस्सी तिला भेटतो. एक पोलिसही भेटतो. भेटत नाहीत ते फक्त राजा साहेब, म्हणजेच मिशाचे वडील. फक्त मिशाला ते दिसतात. ते फक्त मिशाला का दिसतात, त्यांचा फोन का बंद आहे, असे प्रश्न मिशाला पडतात. या प्रश्नांची उत्तरं या सिनेमात मिळणार आहेत. ट्रेलर बघितल्यानंतर कथेचा अंदाज येतो. टायटलनेही सिनेमाची कथा काहीअंशी स्पष्ट होते. 

काय आहे ‘गॅसलाइट’चा अर्थ?१९४४ सालाआधी ‘गॅसलाइट’ एकच अर्थ होता. लालटेनला ‘गॅसलाइट’ म्हटलं जायचं. मग यावर्षी एक सिनेमा आला. जॉर्ज क्यूकोर नावाच्या व्यक्तिने ‘गॅसलाइट’ नावाचा सिनेमा बनवला. पॉला ही या सिनेमाची मुख्य नायिका होती. तिची एक नातेवाईक असते. तिचा मृत्यू होतो. पण मरण्याआधी ती तिची संपूर्ण संपत्ती पॉलाच्या नावावर करून गेलेली असते. यादरम्यान पॉला एका मुलावर भाळते आणि दोघंही लग्न करतात. लग्नानंतर पॉला त्या मेलेल्या नातेवाईकाच्या घरी येऊन राहतात आणि त्या घरात विचित्र घटना घडायला लागतात. त्या सुद्धा फक्त पॉलासोबत. सगळे तिला वेड्यात काढतात. इतकं की, पॉला ही स्वत:ला वेडी मानायला लागते. पण प्रत्यक्षात पॉला एकदम ठीक असते. तिच्या आजूबाजूची माणसं तिच्याविरोधात षडयंत्र रचत असतात. या चित्रपटानंतर ‘गॅसलाइट’ या शब्दाचा अर्थ पूर्णपणे बदलला.

‘एखाद्याला जबरदस्तीनं मानसिक रुग्ण ठरवणं’ अशी त्याची ढोबळ व्याख्या केली. हळूहळू ‘गॅसलायटिंग’ या संज्ञेचा वापर वाढू लागला, त्याचा अर्थ अधिक समावेशक झाला. २०१६ मध्ये इंग्लिश भाषेत नव्यानं आलेला अत्यंत उपयुक्त शब्द असं म्हटलं गेलं. २०१८ मध्ये तो वर्षभरात सगळय़ांत जास्त वापरल्या गेलेल्या शब्दांच्या स्पर्धेत दुसरा ठरला,तर २०२२ मध्ये त्यानं पहिला क्रमांक पटकावला. त्याची व्याप्ती वाढली, नवनव्या क्षेत्रात त्याला नवे अर्थ प्राप्त झाले. आता बॉलिवूडमध्ये गॅसलाईट नावाचा सिनेमा येतोय. सारा अली खानच्या 'गॅसलाइट'चा ट्रेलर पाहता सिनेमात सस्पेन्स, थ्रील, नाट्य, थरार अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत.   

टॅग्स :सारा अली खानचित्रांगदा सिंगविक्रांत मेसीबॉलिवूड