Join us  

विकी कौशलच्या सिनेमातून सारा अली खानचा पत्ता कट, साउथच्या या अभिनेत्रीची लागली वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 2:43 PM

साराला विकी कौशल(Vicky Kaushal)चा बहुप्रतिक्षित चित्रपट 'द इमॉर्टल अश्वत्थामा'(The Immortal Ashwatthama)मधून वगळण्यात आले आहे.

अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. सैफ अली खान(Saif Ali Khan)ची लाडकी मुलगी अनेकदा मीडियाच्या चर्चेत असते. आता तिच्याबद्दल आणखी एक बातमी समोर येत आहे, जी साराच्या चाहत्यांना निराश करू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, साराला विकी कौशल(Vicky Kaushal)चा बहुप्रतिक्षित चित्रपट 'द इमॉर्टल अश्वत्थामा'(The Immortal Ashwatthama)मधून वगळण्यात आले आहे. वास्तविक हा चित्रपट कोल्ड स्टोरेजमध्ये गेला आहे असे मानले जात होते. पण, आता या चित्रपटावर काम सुरू होत असल्याच्या बातम्या येत आहेत. पण, त्याचवेळी त्यातही मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. या चित्रपटात मुख्य अभिनेत्री सारा अली खानला रिप्लेस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

'अश्वथामा' बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. चाहतेही या चित्रपटासाठी उत्सुक आहेत. पण, आता पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, या चित्रपटाशी संबंधित एक मोठी माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात पहिली अभिनेत्री सारा अली खान मुख्य भूमिकेत झळकणार होती. पण, आता ती चित्रपटातून बाहेर पडली आहे. निर्मात्यांनुसार, विक्कीपेक्षा वयाने मोठी दिसणारी अभिनेत्रीची वर्णी लागणार होती.

रिपोर्ट्सनुसार आता चित्रपटात बरेच बदल करण्यात आले आहेत. चित्रपटाच्या आधीच्या स्क्रिप्टनुसार, तरुण स्त्री पात्र चित्रपटात दाखवायचे होते, म्हणून साराला साइन करण्यात आले. पण, आता कथा बदलली आहे. त्यानुसार एका अभिनेत्रीला घ्यायचे आहे, जी चित्रपटाचा मुख्य अभिनेता विकी कौशलपेक्षा वयाने मोठी आहे. रिपोर्ट्सनुसार, मेकर्सनी समंथा रुथ प्रभूच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र, याबाबत निर्मात्यांनी अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही.

समोर येत असलेल्या बातम्यांनुसार, चित्रपटाची मुख्य अभिनेत्री बदलली असेल, परंतु विकी कौशल अजूनही चित्रपटाचा एक भाग आहे. त्याच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. आदित्य धर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. चित्रपटाची कथा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जी आजच्या काळात महत्त्वाची आहे, असे निर्मात्यांचे म्हणणे आहे. विकीची पकड मजबूत आहे आणि प्रेक्षकांमध्ये त्याची विश्वासार्हताही चांगली आहे. त्यामुळे त्यांची बदली करण्यात काही अर्थ नाही. वृत्तानुसार, चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचे कामही सुरू झाले आहे. या चित्रपटाची कथा महाभारतातील अश्वत्थामा या व्यक्तिरेखेवर आधारित असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :सारा अली खानविकी कौशलसमांथा अक्कीनेनी