बॉलिवूडचा शहजादा कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान ही जोडी चाहत्यांची आवडती आहे. दोघेही काही काळ दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र कालांतराने त्यांचा ब्रेकअप झाला आणि ते वेगळे झाले. मात्र या जोडीचे चाहते आजही आहेत. पण आता दोघांमध्ये पॅचअप झाल्याचं म्हटलं जात आहे. कारण, त्याचा एक लेटेस्ट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यानं चाहत्याचं लक्ष वेधलं आहे.
सारा व कार्तिक अनेकदा एकत्र पाहायला मिळाले. अशातच सध्या सारा व कार्तिकचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये सारा, कार्तिक, करीना कपूर आणि करिश्मा कपूर दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये सारा अली खान ही कार्तिक आर्यनला फ्लाइंग किस देताना दिसत आहे. दोघेही यावेळी सिंपल आणि सोबर आऊटफिटमध्ये दिसले. त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. सारा आणि कार्तिकला पुन्हा एकदा एकत्र येण्याची विनंती चाहत्यांनीही केली आहे.
सारा अली खान आणि कार्तिक आर्यन इम्तियाज अलीच्या 'लव आज कल' या चित्रपटात एकत्र काम केले होते. दोघांमधील केमिस्ट्री या सिनेमात पाहायला मिळाली होती. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच दोघांमधील अंतर वाढू लागले. दोघांच्या ब्रेकअपच्या बातमीने त्याच्या चाहत्यांची मनं तुटली. त्यांचे असंख्य चाहते आहेत, जे या दोघांना पुन्हा एकत्र पाहू इच्छितात.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, 'भूल भुलैया 3' मध्ये कार्तिक आर्यनसोबत सारा अली खान झळकणार असल्याचे बोलले जात आहे. अधिकृत घोषणेची चाहते प्रतीक्षा करत आहे. कॉफी विथ करणच्या शोमध्ये साराने कार्तिकसोबतच्या नात्यावर भाष्य केलं होतं. यानंतर कार्तिक मात्र नाराज झाला होता. "नात्याचा, त्या व्यक्तीचा आदर करणं गरजेचं आहे', असं तो म्हणाला होता. आता पुन्हा सारा आणि कार्तिकला एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.