Join us

'साराभाई व्हर्सेस साराभाई' फेम अभिनेत्री तरला जोशींचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 12:38 IST

तरला जोशी या छोट्या पडद्यावरील ‘बा’ म्हणून प्रचलित होत्या.

साराभाई व्हर्सेस साराभाई, एक हजारों में मेरी बहना है या मालिकांसह अनेक मालिकांमध्ये झळकलेल्या टेलिव्हिजन अभिनेत्री तरला जोशी यांचे निधन झाले आहे. त्यांनी रविवारी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर लोक सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत. 

अभिनेत्री निया शर्मा हिने तरला जोशी यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. निया शर्माने तरला जोशी यांच्यासोबत एक हजारों में मेरी बहना है या मालिकेत काम केले होते. निया शर्माने तरला जोशींचे फोटो शेअर करत लिहिले की, RIP बडी बीजी तुमची आठवण येईल. तरला जी तुम्ही नेहमी बडी बीजी राहाल.

तरला जोशी या छोट्या पडद्यावरील ‘बा’ म्हणून प्रचलित होत्या. त्यांनी बंदिनी, साराभाई व्हर्सेस साराभाई आणि एक हजार में मेरी बहना है यासारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. बंदिनी या मालिकेतून तरला यांना खरी ओळख मिळाली होती. तर एक हजार में मेरी बेहना है या मालिकेत त्यांनी अभिनेत्री निया शर्मा आणि क्रिस्टल डिसूझासोबत काम केले होते. 

टॅग्स :निया शर्मा