Join us

नाळ चित्रपटातील जाऊ दे न व गाणे गायले आहे या चिमुकल्याने

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 1:36 PM

नाळ या चित्रपटातील जाऊ दे न व हे गाणे तर प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या गाण्यातील निरागसता प्रेक्षकांना भावत आहे. तुम्हाला माहीत आहे का, हे गाणे एका पाच वर्षांच्या चिमुकल्याने गायले आहे. 

ठळक मुद्देजाऊ दे न व या गाण्याचा गायक जयस कुमार असून सारेगमप लिटिल चॅम्प या कार्यक्रमात तो २०१५ ला झळकला होता. या कार्यक्रमात त्याने सादर केलेली सगळीच गाणी प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. या कार्यक्रमातील परीक्षकांनी छोटे भगवान असे त्याला नाव दिले होते. जयसच्या गायनासोबतच त्याच्या स्मरणशक्तीची देखील चांगलीच चर्चा झाली होती.

गेल्या काही वर्षांत मराठीतील चित्रपटांनी विविध विषयांना हात घालत, अनोख्या पद्धतीने मांडणी करत मराठी चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवलं आहे. ‘फँड्री’ आणि ‘सैराट’ सारख्या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर झी स्टुडीओज आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी नाळ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटातील जाऊ दे न व हे गाणे तर प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या गाण्यातील निरागसता प्रेक्षकांना भावत आहे. तुम्हाला माहीत आहे का, हे गाणे एका पाच वर्षांच्या चिमुकल्याने गायले आहे. 

जाऊ दे न व या गाण्याचा गायक जयस कुमार असून सारेगमप लिटिल चॅम्प या कार्यक्रमात तो २०१५ ला झळकला होता. या कार्यक्रमात त्याने सादर केलेली सगळीच गाणी प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. या कार्यक्रमातील परीक्षकांनी छोटे भगवान असे त्याला नाव दिले होते. जयसच्या गायनासोबतच त्याच्या स्मरणशक्तीची देखील चांगलीच चर्चा झाली होती. जाऊ दे न व हे गाणे रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. 

नाळने पहिल्याच आठवड्यात १४ कोटी रुपयांची कमाई केली असल्याचा दावा झी स्टुडिओने केला आहे. यावरून या चित्रपटाची प्रेक्षकांसोबत नाळ जुळली आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. देविका दफ्तरदार, श्रीनिवास पोफळे, सेवा चव्हाण, दीप्ती देवी, ओम भुतकरआणि नागराज मंजुळे यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

जगात सुंदर असं एकच मूल आहे आणि ते प्रत्येक आईपाशी आहे असे म्हटले जाते. अशाच एका आई आणि मुलाची गोष्ट प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळत आहे. चित्रपटाची कथा आहे लहानग्या चैतन्यची. चैतू आठ वर्षांचा आहे. नदीच्या काठी वसलेल्या महाराष्ट्रातील एका दूरच्या खेड्यात तो राहतो. त्याचे वडील गावातील एक प्रतिष्ठित जमीनदार आहेत, ते चैतूचे सगळे हट्ट पुरवतात. प्रेमळ आणि मायाळू आई त्याचे खूप लाड करते. अशा सुंदर वातावरणात वाढणाऱ्या चैतन्यच्या भावविश्वाचा अनपेक्षित प्रवास नाळच्या कथासूत्रात उलगडताना दिसत आहे. 

टॅग्स :नाळसा रे ग म प