Satish Kaushik Death: बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांची अचानक एक्झिट अनेकांना चटका लावून गेली. सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी ऐकून प्रत्येकजण हळहळला. अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) हे तर मित्राच्या पूर्णपणे खचले. सतीश कौशिक यांचं पार्थिव बघून त्यांना अश्रू आवरले नाहीत. मित्राच्या पार्थिवाशेजारी बसून ते ढसाढसा रडताना दिसले. गेली ४५ वर्ष अनुपम व सतीश एकमेकांना ओळखत होते. या दोघांमध्ये घट्ट मैत्री होती. आपला सच्चा मित्र हे जग सोडून गेला हे कळताच अनुपम यांना मोठा धक्का बसला होता. अद्यापही ते या दु:खातून सावरलेले नाहीत. सतीश यांचं पार्थिव स्मशान भूमीकडे नेत असताना रुग्णवाहिकेमध्ये अनुपम होते. यादरम्यानचाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अनुपम सतीश यांच्या पार्थिवा जवळ बसून ढसाढसा रडताना दिसत आहेत.
८ मार्चलाच संध्याकाळी अनुपम व सतीश फोनवर बोलले होते. सतीश दिल्लीत होते. ते मुंबईवरून परतल्यावर भेटण्याचा दोघांचा प्लान होता. मात्र ज्या दिवशी बोलले, त्याच दिवशी मध्यरात्रीनंतर सतीश कौशिक जग सोडून गेलेत.
सतीश यांच्या आठवणीत अनुपम यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात अनुपम सतीश यांची तेल मालिश करून देताना दिस आहेत. प्रोड्यूसरला खूश्श करण्यासाठी काय काय करावं लागत नाही, असं अनुपम या व्हिडीओत म्हणतात. मज्जा येतेय ना, असं ते सतीश यांना विचारतात. यावर, असंच एक्स्ट्रा डेट्सही देऊन टाक बस्स..., असं म्हणतात. सतीश व अनुपम यांची मैत्री किती घट्ट होती, ते या व्हिडीओवरून कळतं. मौत जीवन का अंत करती है.... रिश्तों का नहीं..., असं कॅप्शन देत अनुपम यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.