साडेसाती या शब्दाचा अर्थ साडे सात वर्षाचा कालावधी होय. शनि सर्व बारा राशी भ्रमण करण्यास ३० वर्षे घेतो. म्हणजे एका राशित शनि अडीच वर्षे वास्तव्य करतो. शनिला ग्रहमालेत ‘छायामार्तंड’ संबोधन आहे. छाया ग्रह म्हणजे जो ग्रह ज्या राशितून भ्रमण करीत असेल त्या राशीच्या मागील राशितील ग्रहांना व पुढील राशितील ग्रहांना त्रास करतो. हाच विचार साडेसातीत अपेक्षित आहे. जेव्हा शनि बाराव्या जन्मराशीतून आणि द्वितीयातून भ्रमण करतो तेव्हा हा परिपूर्ण काळ साडेसातीचा मानला जातो. शनि एका राशित अडीच वर्ष असतो. तेव्हा तीन शनिच्या एकूण वास्तव्यास साडेसाती म्हणतात. जन्मपत्रीकेतील मूळ चंद्राराशीच्या मागे व पुढे शनि असेपर्यंत साडेसाती समजली जाते. जेव्हा चंद्राचे मागील राशितील शनिचे भ्रमण सुरु होते तो साडेसातीचा पूर्वार्ध होय. जन्मस्थ चंद्रावरून शनि भ्रमण करतो त्याला मध्यकाळ, तर चंद्राचे पुढील राशितून शनि जातो त्या वेळेस अंतकाळ वा उत्तरार्ध म्हणतात. यापैकी कोणता काळ शुभ व अशुभ हे पाहणे महत्वाचे ठरते.>साडेसातीचा एखाद्यावरचा प्रभावसाडेसातीचा प्रभाव प्रत्येकाच्या कुंडलीनुसार वेगवेगळा मिळतो. शनिचं भ्रमण ज्या स्थानातून/राशीतून सुरु असतं, त्या स्थानावरून पाहिल्या जाणाऱ्या जीवनातील त्या त्या गोष्टींवर शनीचा प्रभाव पडतो. अर्थात नखाला दुखापत झाली तरी पूर्ण शरीराला वेदना होतात तसं इथे होतं. शनि ज्योतिषशास्त्रात पाप ग्रह मानला गेला आहे परंतु मुळात तो तसा नाही. शनी न्यायी आहे आणि न्याय करताना तो अजिबात आपपरभाव करत नाही. शनि मृत्यूचा कारक आहे. साडेसातीत काही लोकांवर कठीण प्रसंग येतात हे खरे असलं तरी याच काळात आपलं कोण आणि परकं कोण याची नव्याने ओळख होते. साडेसातीच्या काळात आपले अनेक निर्णय चुकतात, योजना फसतात, अनेकदा नको हे जीवन असेही प्रसंग काही लोकांवर येतात परंतु स्वत:वर विश्वास आणि चिकाटी असलेली माणसं यातून तावून सुलाखून बाहेर पडतात. >प्रत्येकाचे आयुष्य त्याच्या कर्माशी कसे निगडित असते?साडेसाती आपल्या पूर्वायुष्यात केलेल्या कर्माचे फळ असते, असे मानले जाते. शनि वाईट काहीच करत नाही तर आपण आपल्या पूर्वायुष्यात केलेल्या कर्माचे फळ देतो. >साडेसातीचा खरा अर्थ !साडेसातीच्या दुष्प्रभावाबद्दल सतत विचार करून घाबरण्यापेक्षा याकाळात संयम राखण्याचा सल्ला दिला जातो. साडेसातीला अजिबात घाबरू नका. शनि जे करतो ते चांगल्यासाठीच यावर विश्वास ठेवा, अंतिमत: चांगलंच होतं. फक्त टिकून राहा, स्वत:वरचा विश्वास ढळू देऊ नका. शनिविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पाहात राहा फक्त कलर्स चॅनलवरील ‘शनि’ ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता.
शनि, पाप दूर करणारा ग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2017 2:46 AM