छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे सातव्या मुलीची सातवी मुलगी. गूढ कथानक असलेली ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. इंद्राणी कोण आणि तिचा राजाध्यक्षंच्या घरात येण्यामागचा हेतू काय हे सगळ्यांसमोर आलं. पद्माकर आजोबांच्या मृत्यूनंतर मात्र त्यानंतरही राजाध्यक्ष कुटुंब इंद्राणीला बेघर होऊ देत नाही. तिला घरातच राहू दिलं जातं. दररोज येणाऱ्या नवनवीन वळणांमुळे ही मालिका आणि त्यातील कलाकार लोकप्रिय होत आहेत. यामध्येच सध्या मालिकेतील पद्मजा आजीची चर्चा रंगली आहे.
या मालिकेतील पद्मजा आजी यांना प्रेक्षकांकडून विशेष पसंती मिळत आहे. ही भूमिका अभिनेत्री रजनी वेलणकर साकारत असून आजवर त्यांनी अनेक गाजलेल्या नाटक, सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. इतकंच नाही तर त्यांचे पती आणि लेकसुद्धा प्रसिद्ध मराठी कलाकार आहेत.
रजनी या कॉलेजमध्ये असल्यापासून नाटकांमध्ये काम करतात. विशेष म्हणजे कॉलेजच्या सेकंड इअरला असताना त्यांचं लग्न ठरलं. मात्र, सासरच्या कुटुंबाचा पाठिंबा असल्यामुळे त्या घर आणि करिअर यांची गाडी व्यवस्थित सांभाळू शकल्या. रजनी वेलणकर या अभिनेता प्रदीप वेलणकर यांच्या पत्नी असून मधुरा वेलणकर हिच्या आई आहेत.
दरम्यान, रजनी यांनी मधुचंद्राची रात्र, त्रिभंग, चौकट राजा, बिनधास्त अशा गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. सध्या त्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत काम करत आहेत. त्यांच्यासोबत तीतीक्षा तावडे, अजिंक्य ननावरे, ऐश्वर्या नारकर, मुग्धा गोडबोले, राहुल मेहेंदळे, श्वेता मेहेंदळे, अजिंक्य जोशी, अमृता रावराणे ही कलाकार मंडळी आहेत.