'भाभी जी घर पर हैं' टीव्ही मालिकेतून घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री सौम्या टंडन आता मालिकेत झळकत नसली तरी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या सगळ्या अपडेट ती चाहत्यांसह शेअर करत असते. सौम्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने 2020 मध्ये ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि तिच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला होता, कारण तिला अनिता भाभी या व्यक्तिरेखेत खूप पसंत केले गेले होते. मालिकेत सौम्याने या शोमध्ये साडेपाच वर्षे काम केले होते. मालिका सोडण्याचे अनेकदा कारणही तिला विचारण्यात आले होते. आता पुन्हा एकदा तिने तिचे शूटिंगचे दिवस आठवत आपला अनुभव शेअर केला आहे. मालिका सोडण्याचा मला अजिबात पश्चात्ताप नसल्याचे तिने म्हटले आहे.
सौम्या टंडनने तिच्या मेहनतीच्या जोरावर टीव्ही आणि चित्रपटांच्या दुनियेत एक स्थान मिळवले आहे. ती जवळपास 15 वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करते. इम्तियाज अली दिग्दर्शित 'जब वी मेट' या चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. गेल्या १५ वर्षात मी बॅक टू बॅक शो केले आहेत. स्वतःसाठी अजिबात वेळ मिळायचा नाही. एका पाठोपाठ काम असल्यामुळे मी चांगलीच भरडली गेली होती.
सौम्या टंडनने खुलासा केला की ती अजूनही 'भाभी जी घर पर है' कलाकारांच्या संपर्कात आहे.ती शो बघणं अजिबात चुकवत नाही. आम्ही एका कुटुंबासारखे आहोत म्हणून मी शोमधील प्रत्येकाच्या संपर्कात आहे. मालिकेत इतके वर्ष काम केल्यामुळे सगळ्यांशी वेगळेच नाते निर्माण झाल्याचेही सौम्याने म्हटले आहे.
आता पूर्वीसारखी रोज पडद्यावर दिसण्याची इच्छाही नाही, सध्या मुलाची काळजी घेण्यात सौम्या व्यस्त आहे. सौम्याला चार वर्षांचा एक मुलगा आहे. अभिनेत्रीने 2019 मध्ये मुलाला जन्म दिला होता. हा टप्पा खूप एन्जॉय करत आहे.तिच्या मुलाचं नाव मिरान असं ठेवण्यात आलं आहे. सौम्या सतत सोशल मीडियावर आपल्या मुलाचे फोटो शेअर करत असते.