अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी मराठीच नाही तर तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी, गुजराती आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सयाजी शिंदे यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. याशिवाय ते सामाजिक कार्यातही सहभाग घेताना दिसतात. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना माहित आहे. त्यांच्या पत्नी आणि मुले लाइमलाईटपासून दूर राहतात. त्यांची पत्नी खूप सुंदर दिसते.
सयाजी शिंदे यांनी १९७८ मध्ये मराठी एकांकिका नाटकातून अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली. १९८७ मध्ये झुल्वा नावाच्या मराठी नाटकात त्यांचा अभिनय चांगलाच हिट ठरला आणि तेव्हापासून त्यांना खूप लोकप्रियता मिळू लागली. त्यानंतर त्यांनी इतर प्रादेशिक भाषांमध्येही अभिनय करण्यास सुरुवात केली.
१९९५ साली अबोली हा अभिनेता म्हणून सयाजी शिंदे यांचा पहिला मराठी चित्रपट होता. तसेच त्यांनी बऱ्याच मराठी नाटकात काम केले आहे. त्यापैकी सखाराम बाईंडर यांच्या भूमिकेची खूप प्रशंसा झाली होती.
झुल्वा, वन रूम किचन आणि आमच्या या घरात ही नाटके खूप गाजली. त्यानंतर त्यांनी बर्याच मराठी चित्रपटांमध्ये काम केले. त्यापैकी गोष्ट छोटी डोंगरा एवढी या चित्रपटात कृषीमंत्री म्हणून त्यांची भूमिका सर्वांच्या लक्षात राहिली. सयाजी शिंदे यांनी बऱ्याच हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे.
सयाजी शिंदे यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे तर त्यांच्या पत्नीचे नाव अलका शिंदे असून त्यांना सिद्धार्थ नावाचा एक मुलगा आहे. त्यांची पत्नी आणि मुलगा लाइम लाईटपासून दूर राहतात. मात्र त्यांचे सोशल मीडियावर फोटो पहायला मिळतात.