Join us  

मनाजोगे जगण्याचा मंत्र सांगणाऱ्या... लव्ह स्टोरीचा तमाशा!

By admin | Published: November 22, 2015 2:38 AM

रणबीर आणि दीपिका यांचा ‘तमाशा’ हा चित्रपट २७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. यू टीव्ही निर्मित हा चित्रपट साजिद नाडियादवाला घेऊन आले आहेत. ‘जब वी मेट’, ‘लव्ह आज कल’

रणबीर आणि दीपिका यांचा ‘तमाशा’ हा चित्रपट २७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. यू टीव्ही निर्मित हा चित्रपट साजिद नाडियादवाला घेऊन आले आहेत. ‘जब वी मेट’, ‘लव्ह आज कल’, ‘रॉक स्टार’ आणि ‘हायवे’सारखे चित्रपट बनविणाऱ्या दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा हा नवा चित्रपट आहे. ‘बचना ऐ हसिनो’ आणि ‘ये जवानी है दिवानी’मध्ये आपल्या केमिस्ट्रीचे रंग दाखविणाऱ्या या जोडीच्या तमाशा या नव्या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. रणबीर आणि दीपिकाने ‘लोकमत’च्या मुंबई कार्यालयात संपादकीय टीमशी साधलेला हा संवाद...तमाशा नेमका कोणत्या प्रकारचा चित्रपट आहे? रणबीर कपूर : ही एक लव्ह स्टोरी आहे; पण चित्रपटात असे काही मुद्दे हाताळण्यात आले आहेत की, ज्याचा आजच्या तरुणांशी खूपच जवळचा संबंध आहे. आम्हाला खात्री आहे की, प्रत्येक तरुण या चित्रपटाशी स्वत:ला पडताळून पाहील. दीपिका : रणबीरने अगदी बरोबर सांगितले की, हा तरुणांसाठीचा चित्रपट आहे. यात काही भाषणबाजी नाही, पण युवा वर्गासाठी खूप काही आहे. तसे पाहिले तर रणबीर आणि मी खूप लकी आहोत की, आम्ही आमच्या करिअरबाबत जो विचार केला तेच आम्हाला मिळाले. कारण, आमच्या कुटुंबाने आणि खास करून आमच्या आई-वडिलांनी आमच्या भावना समजून घेतल्या व आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केले; परंतु मला ठाऊक आहे की, सर्वच जण इतके भाग्यवान नसतात. आजच्या तरुणांवर करिअरच्या बाबतीत खूपच दबाव आहे. आई-वडिलांच्या अपेक्षांमुळे कधी कधी अगदी गुदमरल्यासारखे होते किंवा आई-वडिलांसोबत वाद तरी होतात. याच विषयावर हा चित्रपट आहे.चित्रपट आई-वडिलांच्या, की मुलांच्या दृष्टिकोनातून बनविला आहे? रणबीर कपूर : मला वाटते की यात दोन्ही बाजू आहेत. दोघांचेही दृष्टिकोन एक-दुसऱ्यांशी मिळतेजुळते होतात. दीपिका : आज इतकी स्पर्धा आहे की, प्रत्येकाला सर्वांत पुढे जायचे आहे; आणि याच कारणामुळे लोक आपला आनंदच हरवून बसले आहेत. त्याचा परिणाम लोकांच्या आयुष्यावर होत आहे आणि ते एन्जॉय करू शकत नाहीत. चित्रपटाला तमाशा हे नाव कसे फिट होते?दीपिका : हे कथानक आहे वेदचे. रणबीरची ही भूमिका आहे. त्याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे. त्यालाच तमाशा म्हटले जाते. आपले हे स्वप्न साकारण्यासाठी धडपडणाऱ्या वेदचे वडिलांशी याच मुद्द्यावरून वाद होतात. कारण की, ते वेदला या क्षेत्रात जाण्यापासून रोखू इच्छितात. आपल्या दोघांच्या केमिस्ट्रीची पुन्हा खूप चर्चा आहे. त्यामुळे अपेक्षाही वाढल्या आहेत. आपण दोघे काय विचार करता? दीपिका : खरे सांगायचे तर आम्ही काय विचार करतो यावर काही अवलंबून नाही. मला असे वाटते की, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच्या या चर्चा आहेत. जेव्हा लोक थिएटरमध्ये येतात तेव्हा त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचा असतो चित्रपट, यातील पात्र आणि कथानक़ अर्थात या केमिस्ट्रीलाही एक महत्त्व आहे; पण सर्वांत महत्त्वाचे आहे कथानक आणि पात्र. रणबीर : दीपिकाने बरोबर सांगितले; पण चित्रपटासाठी सर्वांत महत्त्वाचे हे आहे की, आम्ही जी निर्मिती करत आहोत ती नेमकी काय आहे? आणि हे का करत आहोत? हे कोणासाठी आहे? जर कथानक दमदार असेल, दिग्दर्शक आणि टीमचा चांगला संवाद असेल तर मला असे वाटते की, बाकी सर्व गोष्टी मागे राहतात. या चित्रपटाच्या बाबतीत बोलायचे झाले तर आमच्या टीमने खूप मेहनत घेतली आहे; आणि प्रत्येकाला विश्वास आहे की, लोक हा चित्रपट एन्जॉय करतील. इम्तियाज अलींचा प्रत्येक चित्रपट एका प्रवासाभोवती फिरत असतो. हा चित्रपटही असाच आहे? रणबीर : तसे पाहिले तर प्रत्येकाच्या आयुष्यात प्रवासाशिवाय काय असते? प्रत्येक दिवसाबरोबर आमचा प्रवास पुढे जात असतो; मात्र या चित्रपटाच्या बाबतीत मी नक्की सांगू शकतो की, हा केवळ रोडवरील प्रवास नाही. आयुष्यावर यात भाष्य केलेले आहे. इम्तियाज अलींबाबत आपल्या दोघांचा अनुभव वेगळा आहे. याबाबत काय सांगाल? रणबीर : अगदी बरोबर; पण ट्युनिंगशिवाय एकाही चित्रपटात काम करणे शक्य नाही. इम्तियाज यांची शैली समजल्याशिवाय त्यांच्यासोबत काम करता येत नाही; आणि आम्ही दोघे एकमेकांना चांगलेच ओळखतो. आम्ही दोघांनी जेव्हा सोबत काम केले तेव्हाही आणि सोबत काम केले नाही तेव्हाही एकमेकांना समजून घेतले आहे. दीपिका : इम्तियाज यांच्या सोबत मी ‘लव आज कल’मध्ये काम केले आहे. तेव्हा मला वाटले की, ते मला एक आव्हानात्मक भूमिका देत आहेत. ते माझ्यासाठी चॅलेंज होते. इम्तियाज अली कलाकारातील गुण-दोष चांगलेच ओळखतात. कथानक आणि कलाकार यांच्यावर त्यांचा जो विश्वास आहे ते पाहूनच हे जाणवते की, ही व्यक्ती किती एकाग्र होऊन काम करीत आहे. या चित्रपटात आपण ताराच्या भूमिकेत आहात. ताराची भूमिका नैना (येजवानी है दिवानी) आणि पिकूसारख्या आपल्या भूमिकेशी स्पर्धा करणारी वाटते का? दीपिका : स्पर्धेचा प्रश्नच नाही. माझ्यासाठी प्रत्येक भूमिका ही महत्त्वाची आहे. प्रत्येक चित्रपटात वेगळी भूमिका असावी, असा माझा प्रयत्न राहिलेला आहे. आतापर्यंत मी अशाच अनेक भूमिका साकारल्या आहेत ज्यात मी सहनशील आहे, मनासारखे काही करू शकत नाही; पण आता ताराची भूमिका वेगळी आहे. ती आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्यावर विश्वास ठेवत असते. अशा भूमिकेत प्रेक्षक प्रथमच मला पाहतील. चित्रपट चालला नाही तर दडपण येते का? रणबीर : प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत मला दडपण असते. दडपणाशिवाय मी आठ वर्षांत कधीच काम केले नाही. चित्रपट चालला नाही तर दडपण आणखी वाढत जाते. आम्ही तर प्रत्येक चित्रपटासाठी खूप मेहनत घेतो; पण काही वेळेस आमच्याकडून थोड्या चुका झाल्या. तेव्हा प्रेक्षकांनी चित्रपट नाकारला. अर्थात, त्या चित्रपटांनीही खूप काही शिकविले आहे. मी कुठल्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करीत नाही. वास्तवतेपासून दूर जाणे योग्य नाही. प्रामाणिकपणे चुका मान्य करा आणि पुढे जा. या वेळी मी इतर गोष्टींपेक्षा ‘तमाशा’बाबतच विचार करीत आहे आणि मला अपेक्षा आहे की, आम्ही यशस्वी होऊ. र ण बी र क पू र चा त मा शारणबीरला जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की, त्याने कधी आयुष्यात तमाशेबाजी केली आहे? तेव्हा त्याने एक किस्सा ऐकविला. जेव्हा पापा ऋषी कपूर हे ‘आ अब लौट चले’ हा चित्रपट बनवीत होते तेव्हा न्यू यॉर्कमध्ये शूटिंग होत होती. रणबीर म्हणतो, मी खूप घाबरलो आणि दादींच्या खोलीत जाऊन लपलो. खूप वेळ तेथेच होतो. कुणालाच माझ्यावर संशय आला नाही की, ती खोडी मी केली होती. वेदच्या भूमिकेत असे काय आहे ज्याने आकर्षित केले? वेदचा साधेपणा आणि त्याचा प्रामाणिकपणा मला अधिक आवडला. तारासोबतची वेदची केमिस्ट्री हीच बाब यामध्ये महत्त्वाची राहिली.अन् दीपिकाला हसू फुटले!रणबीर आणि दीपिकाने या वेळी लोकमतच्या ‘दीपोत्सव’मधील त्यांच्याविषयीच्या लिखाणाला ही अशी दाद दिली. दीपिका या वेळी खास मूडमध्ये होती. दोन-दोन अंक हातात घेऊन एसटी स्टॅण्डवरील फेरीवाल्याच्या थाटात तिने गमतीने हाळी दिली... ‘‘दस का दो.. दस का दो..’’ पण जेव्हा तिला या अंकाची किंमत २०० रुपये आहे हे सांगितले तेव्हा सर्वांसोबत तीही हास्यविनोदात डुबून गेली.