'स्कॅम 1992' फेम हेमंत खेरला हॉलिवूडमधून मिळाली ऑफर, वेबसीरीजमधून मिळाली होती ओळख....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 11:08 AM2020-12-12T11:08:27+5:302020-12-12T11:11:19+5:30
स्कॅम १९९२ बाबत हेमंतने सांगितले की, 'स्कॅम १९९२ ने खरंच आमचं जीवन बदललं आहे. हे खरंय की गेल्या १५ वर्षांपासून मी इंडस्ट्रीमध्ये आहे.
अभिनेता हेमंत खेर नुकताच 'स्कॅम १९९२' वेबसीरीजमध्ये दिसला होता आणि लोकांनी त्याच्या कामाचं भरभरून कौतुकही केलं. आता त्याला थेट हॉलिवूडमधून कामाची ऑफर मिळाली आहे. हॉलिवूडमधील एका निर्मात्याने त्याच्याशी कामासंबंधी संपर्क केला. हेमंतने सांगितलं की, 'ही एक फार अद्भुत संधी आहे आणि मी याबाबत सध्या निर्मात्यासोबत बोलत आहे. मी स्क्रीप्ट वाचली आहे. ही एक वास्तविक आणि एक अद्भुत कथा आहे.
स्कॅम १९९२ बाबत हेमंतने सांगितले की, 'स्कॅम १९९२ ने खरंच आमचं जीवन बदललं आहे. हे खरंय की गेल्या १५ वर्षांपासून मी इंडस्ट्रीमध्ये आहे. पण ओळख मला या वेबसीरीजमुळे मिळाली. त्यामुळे हा आतापर्यंतचा सर्वात यादगार प्रोजेक्ट असेल'. हेमंत खेरने स्कॅम १९९२ मध्ये हर्षद मेहताचा भाऊ अश्विन मेहताची भूमिका साकारली आहे. तर प्रतीक गांधीने हर्षद मेहताची भूमिका साकारली आहे.
हेमंतने नव्या प्रोजेक्टबाबत सांगितलं की, ही एक अद्भुत संधी आणि मला सिनेमाच्या सर्वच बाजूंची माहिती घेणं आवडेल. बॉलिवूड, हॉलिवूड आणि इतरही इंडस्ट्रीतही सुद्धा. सध्या ओटीटीची चलती आहे, प्रत्येक वेबसीरीज आणि सिनेमे जगभरात उपलब्ध आहेत.
हेमंत म्हणाला की, फिल्म मेकर्स मोठ्या संख्येने प्रेक्षकांचं लक्ष आकर्षित करण्यासाठी हे आणखीनच आधुनिक बनवत आहे. त्यामुळे याला अमान्य केलं जाऊ शकत नाही की, हे इंडस्ट्रीसाठीही फायदेशीर ठरेल. उदाहरण द्यायचं तर दिल्ली क्राइमसारखी वेबसीरीज चांगल्या कंटेटमुळे प्रेक्षकांना आवडत आहे आणि ही जगभरात फेमस होत आहे.