Join us

३० हजार कोटींच्या घोटाळ्याने देश हादवून सोडणाऱ्या ‘स्कॅम २००३ – द तेलगी स्टोरी’चा टीझर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 12:52 PM

ही वेबसिरीज 2003 मध्ये देशाला हादरवून सोडणाऱ्या मुद्रांक घोटाळ्यावर आधारित आहे.

हंसल मेहता यांची आगामी वेब सिरीज 'स्कॅम 2003 - द तेलगी स्टोरी' चा नवीन टीझर रिलीज झाला आहे. 'स्कॅम 1992 - द हर्षद मेहता स्टोरी' नंतर प्रेक्षक 'द स्कॅम 2003 - द तेलगी स्टोरी' ची खूप दिवसांपासून वाट पाहत होते. ही वेबसिरीज 2003 मध्ये देशाला हादरवून सोडणाऱ्या मुद्रांक घोटाळ्यावर आधारित आहे.

अलीकडेच या वेबसिरीजचा टीझर शेअर करण्यात आला होता, ज्यामध्ये तेलगीच्या पात्राची घोषणा करण्यात आली होती. आता या मालिकेचा नवा टीझर रिलीज झाला आहे. 'स्कॅम 2003'चा 1 मिनिट 26 सेकंदाचा टीझर खूपच धमाकेदार आहे. 1992 मध्ये झालेल्या 5000 कोटींच्या आर्थिक घोटाळ्यावर आधारित आहे.

यानंतर 2003 मध्ये देशात खळबळ माजवणाऱ्या मुद्रांक घोटाळ्याचा उल्लेख आहे. टीझरनुसार, 2003 मध्ये 30 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. या खेळामागील सूत्रधार अब्दुल करीम तेलगी होता. टीझरमध्ये तेलगी 'मला पैसा कमवण्यात रस नाही, कारण पैसा कमावला जात नाही, तर बनवले जातात' असा डायलॉग लक्ष वेधून घेतोय. 

मे महिन्यात 'स्कॅम 2003 - द तेलगी स्टोरी' चा टीझर रिलीज झाला होता, ज्यामध्ये मास्टरमाइंड अब्दुल करीम तेलगीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव समोर आले होते. गगन देव रियार तेलगीची भूमिका साकारताना दिसणार आहे. गगन हा थिएटर आर्टिस्ट आहे, जो सुशांत सिंग राजपूतच्या 'सोनचिरिया' आणि 'अ सुटेबल बॉय' या चित्रपटांमध्येही दिसला आहे.

 'स्कॅम 2003 - द तेलगी स्टोरी' ही वेबसिरीजचे हंसल मेहता आणि तुषार हिरानंदानी दिग्दर्शन केलं आहे.. संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या या घटनेचे कथानक पत्रकार आणि वृत्तनिवेदक संजय सिंह यांच्या ‘रिपोर्टर्स डायरी’ या हिंदी पुस्तकातून घेण्यात आले आहे.  

टॅग्स :हंसल मेहता