Join us

पडद्यावरील शिक्षक

By admin | Published: September 07, 2015 3:05 AM

शाळेत अनेक विषयांना अनेक शिक्षक, प्रत्येक शिक्षकाचा स्वभाव, शिकवण्याची पद्धत, चिडचिडेपणा हे बहुतेक करून प्रत्येकच माणूस अनुभवतो.

शाळेत अनेक विषयांना अनेक शिक्षक, प्रत्येक शिक्षकाचा स्वभाव, शिकवण्याची पद्धत, चिडचिडेपणा हे बहुतेक करून प्रत्येकच माणूस अनुभवतो. काही याचा आनंद घेतात तर काही शाळा सोडताना हळवे होतात. या शालेय शिक्षकांशिवाय सर्वांनीच इतरही अनेक शिक्षक पाहिले, अनुभवले ते लहान आणि मोठ्या पडद्यावर. अनेक दिग्गज कलाकारांनी ही शिक्षकाची भूमिका चोख बजावून आपली तीच ओळख कायम स्मरणात ठेवायला लावली. आता हेच पाहा ना, ‘पिंजरा’मधील भूमिका कायम लक्षात ठेवायला लावणारे डॉ. श्रीराम लागू, कोणत्याही शाळेत सर्वाधिक दुर्लक्षित असणारे वर्ग म्हणजे ड, ई, फ. अशा वर्गांचे आणि वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘१०वी फ’ चित्रपटातील अतुल कुलकर्णी, ‘नाईट स्कूल’ चित्रपटातील संदीप कुलकर्णी हेदेखील खऱ्या आयुष्यातील शिक्षकांप्रमाणे शिक्षकाचे आयुष्य जगले; आणि या चित्रपटांच्या माध्यमातून एका आदर्श शिक्षकाची प्रतिमाही तयार केली.