Join us

SEE PICS:  महिला रेसलरला आव्हान देणे राखी सावंतला पडले महाग, रिंगमधून थेट रूग्णालयात!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 10:40 AM

बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत चर्चेत राहण्यासाठी काहीही करू शकते. पण एक असाच ड्रामा तिला चांगलाच महागात पडला. इतका की, यामुळे तिला थेट रूग्णालयात भरती करावे लागले.

बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत चर्चेत राहण्यासाठी काहीही करू शकते. पण एक असाच ड्रामा तिला चांगलाच महागात पडला. इतका की, यामुळे तिला थेट रूग्णालयात भरती करावे लागले. होय, हरियाणातील पंचकुला येथे आयोजित कॉन्टिनेंटल रेसलिंग इंटरनॅशनल (सीडब्ल्यूई) बॅनरखाली रंगलेल्या रेसलिंगच्या बिग फाईटमध्ये एका विदेशी महिला रेसलरला आव्हान देणे राखीला महागात पडले. विदेशी महिला रेसलरला इतका राग आला की, तिने राखीची हवेत उचलून थेट जमिनीवर आपटले. यानंतर राखीला थेट रूग्णालयात हलवावे लागले.

बिग फाईटदरम्यान रविवारी महिला रेसलर्सची स्पर्धा आयोजित केली गेली होती. यादरम्यान विदेशी रेसलर रैवलने फाईट जिंकल्यानंतर ओपन चॅलेंज दिले. कुण्या भारतीय महिलेत दम असेल तर तिने माझ्याशी लढावे, असे ती म्हणाली. तिचे हे आव्हान राखीने स्वीकारले आणि  तुझ्यात दम असेल तर तू माझ्यासारखे नाचून दाखव, असे प्रतिआव्हान तिला दिले. यानंतर दोघांमध्येही लढत सुरू झाली.

 

 

लोक राखीच्या लटक्या-झटक्यांवर फिदा होत, तिला चीअरअप करत होते. यादरम्यान काही लोकांनी विदेशी रेसलरला ठेंगा दाखवला. राखीही विदेशी रेसलरला डिवचतांना दिसली. हे सगळे पाहून विदेशी रेसलर रैवल चांगलीच संतापली आणि काही कळायच्या आत तिने राखीला अक्षरश: हवेत उचलून खाली पटकले. यानंतर राखी जोरात ओरडायला लागली.

बाजूला उभे बाऊन्सर रिंगच्या आत आले आणि त्यांनी राखीला कसेबसे उठवले. राखीला पाठीत आणि पोटातील वेदना असह्य झाल्यात. यानंतर तिला लगेच रूग्णालयात हलवण्यात आले.  आयोजक समितीचे सदस्य बलवान यांनी सांगितले की, राखीने विदेशी रेसलर रैवलला डान्ससाठी आव्हान दिले होते. पण रैवलला अचानक राग अनावर झाला आणि तिने राखीला उचलून खाली आपटले. तूर्तास राखी ठीक आहे.   

टॅग्स :राखी सावंत