बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतने मागील वर्षी याच दिवशी म्हणजे १४ जून, २०२० रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याने नैराश्यात इतक्या टोकाचं पाऊल उचलल्याचे सांगितले जाते. मात्र नेमके त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्याच्या निधनामुळे त्याच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता.
पवित्र रिश्ता मालिकेतून सुशांत सिंग राजपूतला घराघरात ओळख मिळाली होती आणि या मालिकेच्या सेटवर सुशांत आणि अंकिता लोखंडे यांच्यात प्रेम फुलले होते.मात्र जवळपास ६ वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर सुशांत आणि अंकिताने एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आजही त्यांची जोडी चाहत्यांना खूप भावते.
सुशांतने त्याच्या करिअरची सुरूवात टेलिव्हिजनवरून केली होती. खरेतर त्याने किस दिश में है मेरा दिल या मालिकेतून करिअरची सुरूवात केली होती. मात्र त्याला खरी ओळख मिळाली होती पवित्र रिश्ता मालिकेतून. पवित्र रिश्ता मालिकेतील सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडेची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती आणि या जोडीला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. दोघांचे स्वभाव वेगळे होते आणि सुरूवातीला एकमेकांच्या जास्त जवळदेखील नव्हते. मात्र काही कालावधीनंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरूवात केली होती.
दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचे त्यांनी छोट्या पडद्यावरील रिएलिटी शो झलक दिखला जामध्ये खुलासा केला होता. मात्र जवळपास ६ वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर सुशांत आणि अंकिताने एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.