Join us

वरूणसोबत नताशाला पाहताच फोटोग्राफर्स ओरडू लागले 'भाभी जी..', अभिनेता म्हणाला - 'अरे आरामात, घाबरेल ती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 15:16 IST

वरूण धवन आणि नताशा दलालचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत वरूणसोबत नताशाला पाहताच फोटोग्राफर्स भाभीजी असे ओरडू लागले होते.

बॉलिवूड अभिनेता वरूण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल नुकतेच लग्नबेडीत अडकले आहेत. त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. त्या दोघांचा व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात वरूणसोबत नताशाला पाहताच फोटोग्राफर्स भाभीजी असे आवाज देताना दिसत आहेत. फोटोग्राफर्सला असे बोलताना ऐकून त्यावर वरूण धवन म्हणाला की, अरे आरामात, घाबरेल ती. त्याचा हा व्हिडीओ वूंपलाने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ७१ हजारांहून जास्त वेळा पाहिला गेला आहे.

या व्हिडीओत वरूण धवन सात फेरे घेतल्यानंतर नताशासोबत मीडियाशी भेटण्यासाठी आला. त्यावेळी वरूण आणि नताशासोबत लोकांची देखील उत्सुकता वाढली आणि ते जोराजोराने ओरडू लागले. यादरम्यान नताशाला पाहून फोटोग्राफर्स भाभीजी असे ओरडू लागले. हे सर्व पाहून वरूण धवन म्हणाला अरे अरे आराम से, घाबरेल ती.

वरूणचा हे रिएक्शन पाहून तिथे उपस्थित असलेले फोटोग्राफर्ससोबत नताशादेखील हसू लागली. याशिवाय त्या दोघांचे लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अलिबागेतील द मेन्शन हाऊस या अलिशान रिसॉर्टमध्ये अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित वरूण व नताशाचा लग्नसोहळा पार पडला. लग्नसोहळा अतिशय खासगी होता. सोहळ्यांचे फोटो लीक होऊ नयेत म्हणून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अगदी मोबाईल वापरण्यासही बंदी करण्यात आली होती.

रात्री उशीरा वरूण व नताशाने लग्नाचे काही फोटो अधिकृतपणे आपल्या अकाऊंटवर शेअर केलेत. शिवाय लग्नानंतर वरूण व नताशा यांनी बाहेर येत मीडियाला पोज दिल्यात. बाहेर ताटकळत उभ्या असलेल्या मीडियाला मिठाई, लाडू वाटण्यात आले.

टॅग्स :वरूण धवननताशा दलाल