बॉलिवूडमध्ये प्रतिष्ठित असलेल्या 'खान'दान कुटुंबात गेल्या काही काळापासून अनेक उलथापालथ सुरु आहे. एकीकडे सलमान खानने (salman khan) अद्यापही लग्न केलेलं नाही. तर दुसरीकडे त्याच्या भावांचे संसार उद्धवस्त होत आहेत. ५ वर्षांपूर्वी मलायका अरोरा (malaika arora) आणि अरबाज खान (arbaaz khan) यांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. त्यांच्यानंतर आता सलमानचा धाकटा भाऊ सोहेल खान (Sohail Khan) व त्याची पत्नी सीमादेखील (Seema Khan) विभक्त होण्यास निघाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच सोहेल व सीमा विभक्त होत असल्याची माहिती समोर आली. जवळपास २४ वर्ष एकमेकांसोबत नेटाने केलेला संसार आता ते मोडणार आहेत. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. या दोघांच्या घटस्फोटाचं कारण अद्यापतरी समोर आलं नसलं. तरीदेखील हे दोघंही त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याचं पाहायला मिळालं. यामध्येच आता सीमाने सोशल मीडियावरील तिचं नाव बदललं आहे.
सध्या सोशल मीडियावर सीमा खानच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलचा फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये सीमाने तिचं नाव चेंज केलं आहे. त्यामुळे सीमा खान ऐवजी आका तिने सीमा किरण सचदेव हे नाव लावलं आहे.
दरम्यान, सोहेल आणि सीमा यांनी १९९८ मध्ये पळून जाऊन लग्न केलं होतं. या दोघांची पहिली भेट अभिनेता चंकी पांडे यांच्या साखरपुड्यात झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली व या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. परंतु, सीमा व सोहेल यांचे धर्म वेगवेगळे असल्यामुळे या लग्नात थोडा अडथळा निर्माण झाला होता. मात्र, सोहेलने एका मौलवींना किडनॅप करुन सीमासोबत लग्न केलं होतं.