सध्या वेगवेगळ्या मराठी वाहिन्यांवर बऱ्याच मालिका सुरू आहेत. नंबर वन मालिका बनण्यासाठी मालिकांमध्ये चढाओढ सुरू असते. आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte), रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla), सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asata), माझी तुझी रेशीमगाठी (Mazi Tuzi Reshimgathi), देवमाणूस २ (Devmanus 2) यासारख्या मालिका या टीआरपी (TRP)च्या रेसमध्ये स्पर्धा करताना पाहायला मिळतात. या टीआरपीच्या रेसमध्ये रंग माझा वेगळा ही मालिका नंबर वनवर आहे. टीआरपीच्या शर्यतीत टॉप फाइव्हमध्ये स्टार प्रवाहच्याच मालिका अग्रेसर आहेत.
रंग माझा वेगळा मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. कारण दीपा आणि कार्तिक पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. त्यांच्यातील दुरावा मिटेल का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. त्यामुळे या मालिकेनं टीआरपीमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. ही मालिका टॉप फाइव्हमध्ये पहिल्या क्रमांकावर आलेली आहे. तर आई कुठे काय करते मालिकेतील अनिरुद्ध, अरुंधती आणि संजना यांच्यामधील त्रिकोणी कहानी प्रेक्षकांना चांगलीच भावते आहे. ही मालिका आता दुसऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचली आहे. काही दिवस ही मालिका पहिल्या क्रमांकावर होती.
'मुलगी झाली हो' पाचव्या क्रमांकावर‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिकाही प्रेक्षकांना आवडत आहे. जयदीप आणि गौरी यांची प्रेम कहानी आता बहरताना दिसत आहे. ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे.सहकुटुंब सहपरिवार ही मालिका प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहे. मालिकांमध्ये पशा, सूर्य यांच्या भूमिका चांगल्या झाल्या असून ही मालिका चौथ्या क्रमांकावर आहे. मुलगी झाली हो ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेतील भूमिका लक्षणीय आहेत. ही मालिका आता पाचव्या क्रमांकावर आपले स्थान टिकवून आहे.
'देवमाणूस २' मालिका सहाव्या क्रमांकावरदेवमाणूस २ ही मालिका सहाव्या क्रमांकावर तर फुलाला सुगंध मातीचा ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे, माझी तुझी रेशीमगाठ आणि येऊ कशी तशी मी नांदायला या मालिका आठव्या आणि नवव्या क्रमांकावर आहे. तर दहाव्या क्रमांकावर बिग बॉस मराठी ३ आहे. या शोने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.