Join us

दिग्पाल लांजेकरने केले ‘कोडमंत्र’चे सात प्रयोग

By admin | Published: March 18, 2017 3:27 AM

दिग्पाल लांजेकरने एक अभिनेता आणि लेखक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. त्याच्या सखी या मालिकेला तर प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता.

दिग्पाल लांजेकरने एक अभिनेता आणि लेखक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. त्याच्या सखी या मालिकेला तर प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. दिग्पाल नुकताच एका नाटकात झळकला होता. या नाटकातील त्याच्या भूमिकेचे सध्या चांगलेच कौतुक होत आहे. मुक्ता बर्वेच्या ‘कोडमंत्र’ या नाटकाची सध्या चांगलीच चर्चा आहे. दिग्पालने या नाटकाचे नुकतेच सात प्रयोग केले आणि यातील त्याच्या कामाचे सगळेच कौतुक करत आहेत. याविषयी दिग्पाल सांगतो, मी स्वत: ‘कोडमंत्र’ या नाटकाचा चाहता आहे. हे नाटक मी आतापर्यंत सात वेळा पाहिले आहे. या नाटकाच्या टीमसोबत तर माझे खूपच चांगले संबंध आहेत. या नाटकाचे निर्माते दिनू काका (दिनेश पेडणेकर), या नाटकात प्रमुख भूमिका साकारणारे मुक्ता बर्वे, अजय पुरकर यांच्यासोबत तर माझे खूपच चांगले नाते आहे. त्यामुळे दिनू काका यांनी कोडमंत्र या नाटकातील एक भूमिका करशील का, असे मला विचारले असता मी क्षणात होकार दिला. या नाटकात डॉ. रमेश गोखले ही भूमिका अजय कासुर्डे साकारतात. अजय हे कोडमंत्र या नाटकाचे सहनिर्मातेदेखील आहेत. त्यांना काही कामासाठी परदेशात जायचे असल्याने त्यांच्या भूमिकेसाठी मला विचारण्यात आले. खरे तर ही भूमिका खूप छोटीशी असली, तरी खूप महत्त्वाची आहे. या भूमिकेमुळे नाटकाची कथा पुढे सरकते. मी केवळ या नाटकाच्या दोन तालमी केल्या आणि नाटकाचे प्रयोग केले. हे नाटक करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. याविषयी या नाटकाचे निर्माते दिनेश पेडणेकर सांगतात, ‘नाटक रंगभूमीवर सादर करण्याआधी दिग्पालने मुक्तासोबत केवळ दोनदा तालमी केल्या होत्या. पण, त्याने ही भूमिका खूपच चांगल्याप्रकारे साकारली आहे.’