Join us

प्रेग्नंसीच्या ७ व्या महिन्यात अशी झाली बेबो करिना कपूरची अवस्था, फोटो पाहून सगळेच झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2020 6:00 AM

करीना म्हणाली की, जेव्हा मी 'लाल सिंग चड्ढा' सिनेमाचे शूटिंग करत होते तेव्हा माहित नव्हते की कोरोना संकट येईल. सिनेमाचे शूटिंग एप्रिलमध्ये संपणार होते आणि त्यानंतर मी कोणताच सिनेमा साइन केला नव्हता.

अलीकडेच करीनाने एक सेल्फी शेअर केला आहे. ज्यावर लोक प्रचंड कमेंट करत आहेत. या फोटोमध्ये करीना क्लोजअप सेल्फी घेताना दिसत आहे. तिच्या डोळ्यांत काजळ, ओठांवर गडद गुलाबी रंगाची लिपस्टिकही तिने लावली आहे. मात्र काही युजर्स तिचा हा लूक पाहून संमिश्र प्रतिक्रीया देत आहेत. काहींना तिचा हा लूक आवडला आहे तर काहींनी नापसंती देत कमेंट करत आहेत.

एका युजरने तर भयानक अशी कमेंट करत करिनाच्या लूकला नापसंती दिली आहे. तर सेलिब्रेटी मंडळी मात्र बेबोची स्तुती करण्यात बिझी आहे.  अनन्या पांडे, अमृता अरोरा, महेप कपूर, सीमा खान, तमन्नाह भाटिया आणि सोनल चौहान यांनीही करिनाच्या या फोटोंवर भरपुर लाईक्स आणि कमेंटस देत पसंती दिली आहे. 

ब्युटीफुल, गॉर्जियस कमेंट तिच्या या फोटोवर पाहायला मिळत आहे.अलीकडेच असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते की, करीना गरोदरपणात का काम करत आहे. अशा स्थितीत तिने विश्रांती घ्यावी. तिच्या काम करण्यावर तिने आपले मत मांडले होते.

प्रेग्नेंसी कोणता आजार नाही आणि मी ही गोष्ट मानते की कठीण काळात आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत काम करु शकत नाही, अशी कारणे देऊन मी गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकत नाही. मी तशी नाही. हो, माझे पालक आणि इतर लोकांनी मला घरी रहायला सांगितले आहे. पण मी घरी बसू शकत नाही. मला काम करायला आवडते.

करीना म्हणाली की, जेव्हा मी 'लाल सिंग चड्ढा' सिनेमाचे शूटिंग करत होते तेव्हा माहित नव्हते की कोरोना संकट येईल. सिनेमाचे शूटिंग एप्रिलमध्ये संपणार होते आणि त्यानंतर मी कोणताच सिनेमा साइन केला नव्हता. प्रेग्नेंट झाल्यानंतर मी माझे सर्व कमिटमेंट्स पूर्ण केल्या आहेत.करीनाने ट्रोलिंगबद्दल सांगितले की, मला वाटते की लॉकडाउन आणि कोविडमुळे लोकांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. सर्वांकडे खूप वेळ आहे. त्यामुळे लोक जास्त चर्चा आणि टीका करत आहे. सर्व घरी बसले आहेत. कित्येक लोकांकडे नोकऱ्या नाहीत. सर्वांनी याकडे ट्रोलिंगसारखे पाहिले नाही पाहिजे. मला वाटते की सर्व घरी कंटाळले आहेत आणि त्यांना काहीतरी करमणुकीसाठी साधन हवे आहे. 

तैमुरच्या जन्माआधी ती जिथे जायची तिथे तिला मुलगा हवा की मुलगी असाच प्रश्न विचारले जायचे. यावर मुलगा असो किंवा मुलगी काही फरक पडत नाही. आई होताना दोन्ही सारखेच असतात असे ती सांगायची. तसेच आजही मुलगा मुलगी असे भेदभाव पाहायला मिळतात. जे मुलींना समान दर्जा देत नाहीत त्यांना हे माहित असावे की एक स्त्री देखील एख जीव आहे. जिच्यात एका जीवाला जीवन देण्याची क्षमता असते.

टॅग्स :करिना कपूरतैमुर