Join us

दोन मुलांच्या वडिलांच्या प्रेमात पडल्या होत्या शबाना आझमी, परंतु अभिनेत्रीला ऐकावे लागले जगाचे टोमणे, म्हणाल्या..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2023 4:25 PM

शबाना आझमी यांच्या आयुष्यात जावेद अख्तर आले तेव्हा ते वैवाहित होते. त्यामुळे जावेद यांच्याशी लग्न करणं शबाना यांच्यासाठी काही सोपं नव्हतं.

बॉलिवूडच्या दुनियेत अशा अनेक जोड्या आहेत ज्यांचे प्रेम दीर्घकाळ टिकले नाही तर काहींचा लग्नानंतर घटस्फोट झाला. मात्र काही अशा जोड्यादेखील आहेत. ज्यांनी आयुष्याचा एकत्र खूप मोठा पल्ला गाठला. शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांची जोडी अशांपैकीच एक आहे. 

शबानासोबत लग्न करण्याआधी अभिनेत्री हनी इराणी यांच्यासोबत जावेद यांचे लग्न झाले होते. हनी आणि जावेद यांचा प्रेमविवाह होता. ‘सीता और गीता’ या चित्रपटाच्या सेटवर हनी आणि जावेद यांची ओळख झाली होती. काहीच दिवसांत त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पुढे जावेद यांच्या आयुष्यात शबाना आझमी आल्यात. जावेद शबानांच्या अब्बांना भेटायला येत. याचदरम्यान शबाना व जावेद यांची मैत्री झाली आणि पुढे प्रेम. 1984 मध्ये जावेद यांनी आपल्या पहिल्या पत्नीला ‘तलाक’ देत शबानांशी लग्न केले. जावेद आधीच विवाहित होते, याचदरम्यान जावेद आणि त्यांची पत्नी हनी यांच्यातील मतभेद वाढले. 

पण जावेद यांच्याशी लग्न करणं शबाना यांच्यासाठी काही सोपं नव्हतं. नुकतंच ‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शबानी यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत भाष्य केलं आहे.  त्या म्हणाल्या, 'हा खूप, खूप कठीण टप्पा होता. मला वाटत नाही की कोणाला माहिती  असले की यातील तीन लोकांना काय भोगावे लागते. ' हे खूप कठीण आहे, खूप वेदनादायक आहे, विशेषत: जेव्हा मुलं गुंतलेली असतात. तुम्हाला खूप कठीण काळातून जावं लागतं.

शबाना आझमी यांनी खुलासा केला की, हा काळ इतका कठीण होता की जावेद आणि त्यांनी मुलांमुळे अनेक वेळा त्यांचं नातं संपवण्याचा प्रयत्न केला. आज शबाना झोया आणि फरहान या दोघांच्याही जवळ असल्याबद्दल त्या स्वत:ला भाग्यवान समजतात आणि हनी कुटुंबातील सदस्याप्रमाणे आहे. त्यांनी सांगितले की, "आम्ही अनेक वेळा ब्रेकअप करण्याचा प्रयत्न केला, खरं तर तीनदा आम्ही मुलांमुळे वेगळे होण्याचा प्रयत्न केला, पण तसे झाले नाही. आमचं आमच्या मुलांबरोबर चांगलं नातं आहे. आमच्या नात्याला शेवटी अगदी चांगलं वळण मिळालं.''

 

टॅग्स :शबाना आझमीजावेद अख्तर